Sabudana Thalipith Saam Tv
लाईफस्टाईल

Ashadhi Ekadashi Special Recipe: आषाढी एकादशीचा उपवास आहे? मग झटपट तयार करा साबुदाण्याची ही टेस्टी रेसिपी

Sabudana Thalipith Recipe: साबुदाण्याची खिचडी आणि वडे खाऊन कंटाळा आला असेल तर ही रेसिपी जरुर ट्राय करा.

Priya More

Ashadhi Ekadashi 2023: आज आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi 2022) आहे. आषाढी एकादशीनिमित्त विठुरायाच्या दर्शनासाठी वारकरी पंढरपूरमध्ये दाखल झाले आहेत. आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल भक्तांचा उपवास (Ashadhi Ekadashi 2023 Fast) असतो. उपवासानिमित्त साबुदाणाची खिचडी, साबुदाणाचे वडे, वरीचे तांदूळ अशाप्रकारच्या वेगवेगळ्या रेसिपी तयार केल्या जातात.

जर तुम्हाला साबुदाण्याची खिचडी आणि वडे खाऊन कंटाळा आला असेल तर आज आम्ही तुम्हाला साबुदाण्याची एक खास रेसिपी जाणून घेणार आहोत. आषाढी एकादशीनिमित आज आपण साबुदाण्याचे थालीपीठ (Sabudana Thalipith) कसे तयार करायचे हे पाहणार आहोत. ही रेसिपी अतिशय झटपट तयार होते आणि खायला खूपच चविष्ट लागते.

साबुदाण्याचे थालीपीठ तयार करण्यासाठी लागणारे साहित्य –

– 1/2 कप साबुदाणा

– 1/2 कप पाणी

– छोटा किसलेला बटाटा

– हिरव्या मिरचीचा ठेचा

– जिरं (आवडीनुसार)

– 1 चमचा किसलेले आले

– बारीक चिरलेली कोथिंबीर

– 2 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट

– चवीनुसार सैंधव मीठ

– साजूक तूप

साबुदाण्याचे थालीपीठ तयार करण्याची कृती -

साबुदाण्याचे थालीपीठ तयार करण्यासाठी सर्वात आधी अर्धा कप साबुदाणे न भाजता असेच मिक्सरमध्ये टाकून त्याची बारीक पूड तयार करुन घ्या. साबुदाण्याची पूड एका बाऊलमध्ये घ्या आणि त्यामध्ये अर्धाकप पाणी टाकून ते भिजत ठेवा. 10 मिनिटं साबुदाण्याची पूड झाकूण ठेवा भिजत ठेवा. साबुदाण्याची पूड व्यवस्थित भिजल्यानंतर त्यामध्ये किसलेला बटाटा टाका. यामध्ये हिरव्या मिरचीचा ठेचा, जिरं, किसलेले आले, कोथिंबिर, शेंगदाण्याचा कूट आणि सैंदव मीठ टाकून हे सर्व मिश्रण एकजीव करा.

आता गॅसवर पॅन ठेवा. गॅस मंद आचेवर करुन त्यावर एक चमचा तूप टाका. साबुदाण्याच्या मिश्रणाचा एक गोळा तयार करुन घ्या आणि तो तव्यावर ठेवून चमच्याच्या सहाय्याने त्याला दाबून दाबून पोळीसारखा गोल आकार तयार करा. आता हे साबुदाण्याचे थालीपीठ एका बाजूने व्यवस्थित भाजून घ्या. त्यानंतर दुसऱ्या बाजूला देखील तूप लावून ते खरपूस भाजून घ्या. अशा पद्धतीने आपले कुरकुरीत आणि खुसखुशीत थालीपीठ तयार झाले होईल. हे थालीपीठ तुम्ही चटणी किंवा कोशिंबीरसोबत खाऊ शकता. हे थालीपीठ खूपच चविष्ट लागले. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण ते आवडीने खातात.

सौजन्य : मधुराज रेसिपीज.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: एसटी प्रवर्गातील आरक्षणासाठी धनगर समाज बांधवांचे बीडमध्ये आंदोलन

Sanjay Raut : आनंद दिघे नेते नव्हते, बाळासाहेबांच्या शेजारी त्यांचा फोटो का? संजय राऊतांचा सवाल

Liquor License : नेत्यांच्या कंपन्यांना मद्यविक्री परवाने नाही | पाहा VIDEO

Shocking: धक्कादायक! पोलिसाच्या गाडीने तरूणाला चिरडले, जागेवरच मृत्यू; ASI आणि कॉन्स्टेबलला ठोकल्या बेड्या

Maharashtra Rain : महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर होणार का? जाणून घ्या सरकारचे A टू Z निकष

SCROLL FOR NEXT