Shruti Vilas Kadam
अननसामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन C असते, जे हिवाळ्यात सर्दी, खोकला आणि फ्लूपासून शरीराचे संरक्षण करण्यास मदत करते.
अननसातील ब्रोमेलिन हे एन्झाइम अन्नपचन सुधारते. हिवाळ्यात होणारी अपचनाची समस्या कमी करण्यासाठी अननस उपयुक्त ठरतो.
थंडीत अनेकांना सांधेदुखी किंवा सूज जाणवते. अननसातील अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म वेदना कमी करण्यास मदत करतात.
अननस कफ पातळ करण्यास मदत करतो, त्यामुळे सर्दी, घसा दुखणे आणि खोकल्यापासून आराम मिळतो.
हिवाळ्यात त्वचा कोरडी पडते. अननसातील अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन्स त्वचेला ओलावा देऊन नैसर्गिक चमक टिकवतात.
कमी कॅलरी आणि जास्त फायबरमुळे अननस पोट भरलेले ठेवतो, त्यामुळे हिवाळ्यात वाढणारे वजन नियंत्रणात राहते.
अननस शरीरातील मेटाबॉलिझम वाढवतो आणि नैसर्गिक ऊर्जा देतो, त्यामुळे थंडीत येणारा आळस दूर होतो.