Shruti Vilas Kadam
आठवड्यातून २ वेळा चेहऱ्यावर बेसन आणि गुलाब पाणी फेसपॅक लावल्याने चेहऱ्याला चांगला फायदा होतो.
बेसन त्वचेवरील मळ, धूळ आणि अतिरिक्त तेल काढून टाकण्यास मदत करते, तर गुलाब पाणी त्वचेला ताजेतवाने ठेवते.
तेलकट त्वचेसाठी बेसन आणि गुलाब पाण्याचा फेसपॅक फायदेशीर ठरतो. यामुळे त्वचेवरील जादा तेल कमी होऊन चेहरा मॅट दिसतो.
गुलाब पाण्याचे अँटीबॅक्टेरियल गुणधर्म आणि बेसनची क्लिन्झिंग क्षमता पिंप्सलची कमी करण्यास उपयुक्त ठरते.
नियमित वापरल्यास त्वचेवरील मृत पेशी निघून जातात आणि नैसर्गिक चमक वाढते, ज्यामुळे त्वचा अधिक उजळ दिसते.
गुलाब पाणी त्वचेला थंडावा देतं आणि सनबर्न किंवा त्वचेची जळजळ कमी करण्यास मदत करतं.
योग्य प्रमाणात गुलाब पाणी मिसळल्यास बेसन त्वचा कोरडी न करता मऊ आणि पोषणयुक्त ठेवण्यास मदत करते.
बेसन आणि गुलाब पाणी हे पूर्णपणे नैसर्गिक घटक असल्याने त्वचेसाठी सुरक्षित असून, नियमित वापरासाठी योग्य आहेत.