Shruti Vilas Kadam
सुमारे १ कप बदाम रात्री पाण्यात भिजत ठेवा. सकाळी त्याची सोलं काढून घ्या आणि मिक्सरमध्ये बारीक पेस्ट तयार करा.
बदाम पेस्टच्या प्रमाणानुसार साखर वापरा. साधारण अर्धा ते पाऊण कप साखर पुरेशी असते. गोडी आवडीनुसार कमी-जास्त करू शकता.
बदाम हलव्याला खास चव देण्यासाठी शुद्ध तुपाचा वापर आवश्यक आहे. साधारण अर्धा कप तूप वापरल्यास हलवा छान मऊ आणि चमकदार होतो.
कढईत तूप गरम करून त्यात बदाम पेस्ट घाला. मध्यम आचेवर सतत ढवळत राहा, अन्यथा हलवा तळाला लागू शकतो.
बदाम पेस्ट थोडी जाड वाटत असल्यास अर्धा कप दूध किंवा पाणी घालू शकता. यामुळे हलवा अधिक मऊ आणि रेशमी होतो.
चवीसाठी वेलची पावडर आणि रंग-सुगंधासाठी केशराचे धागे घाला. यामुळे हलव्याला खास राजेशाही स्वाद मिळतो.
तयार झालेल्या बदाम हलव्यावर काजू, पिस्ता किंवा बदामाच्या कापांनी सजावट करा आणि गरमागरम सर्व्ह करा.