Hair Fall Remedy google
लाईफस्टाईल

Super Seeds: केस गळणे, कोंडा आणि मुरुमांमुळे वैतागलात? मग या ५ बियांचे फायदे वाचाच

Ayurvedic Tips: केस गळणे, कोंडा आणि मुरुमांचा त्रास कमी करण्यासाठी हे ५ सुपरसीड्स उपयोगी ठरतात. अळशी, मेथी, तीळ, सूर्यफूल आणि कलोनजी बिया देतील नैसर्गिक सौंदर्याचा रहस्यपूर्ण परिणाम.

Sakshi Sunil Jadhav

सुंदर त्वचा आणि दाट केस मिळवण्यासाठी अनेक जण महागडी प्रोडक्ट्स महिला वापरतात. पण खरं सौंदर्य आपल्या आहारात दडलेले असते. निरोगी आणि चमकदार त्वचा तसेच दाट, मजबूत केसांसाठी काही खास बिया म्हणजेच सुपरसीड्स वरदान ठरतात. त्वचारोगतज्ज्ञांच्या मते, रोजच्या आहारात या बियांचा समावेश केल्याने केस गळणे, कोंडा आणि मुरुमांपासून आराम मिळतो आणि नैसर्गिक सौंदर्य टिकून राहते.

सूर्यफूल बिया (Sunflower Seeds): सूर्यफुलाच्या बियांमध्ये व्हिटॅमिन ई मुबलक प्रमाणात असतं. जे त्वचेची चमक वाढवते आणि फ्री रॅडिकल्सपासून संरक्षण करते. दररोज या बिया स्नॅक म्हणून खाल्ल्यास त्वचा अधिक उजळ आणि निरोगी दिसते.

अळशीच्या बिया (Flax Seeds):अळशीच्या बियांमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात. या बिया हार्मोन्स संतुलित ठेवतात आणि मुरुम कमी करण्यात मदत करतात. स्मूदी, दही किंवा सॅलडमध्ये अळशीचा समावेश केल्यास त्वचेची आतून काळजी घेतली जाते.

मेथीचे दाणे (Fenugreek Seeds): मेथीच्या बियांमध्ये प्रथिनांचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे केस जाड आणि मजबूत होतात. हे दाणे पाण्यात भिजवून सकाळी खाल्ले किंवा केसांसाठी मास्क म्हणून वापरले तर केसांची घनता वाढते.

काळे तीळ (Black Sesame Seeds): काळ्या तिळांमध्ये असे पोषक घटक असतात जे केस पांढरे होण्याची प्रक्रिया मंदावतात. दररोज थोडे काळे तीळ खाल्ल्याने केस नैसर्गिकरित्या काळे, मजबूत आणि चमकदार राहतात.

कलोनजीच्या बिया (Nigella Seeds): कोंडा कमी करण्यासाठी कलोनजीच्या बिया अत्यंत प्रभावी आहेत. या बिया टाळूवरील बुरशी रोखतात आणि केसांच्या मुळांना पोषण देतात. त्यांच्या तेलाचा वापर केल्याने केस अधिक निरोगी दिसतात. दररोज या बियांचा आहारात समावेश केल्यास त्वचा आतून चमकदार होते, केसांची ताकद वाढते आणि कोंडा-मुरुमांचा त्रास लक्षणीयरीत्या कमी होतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan News : कल्याणमध्ये पोलिसांकडून २ वर्षांच्या मुलीवर गंभीर गुन्हा, काय आहे संपूर्ण प्रकरण? Video

Chandrashekhar Bawankule : फोन टॅपिंगनंतर आता मोबाईल सर्व्हिलन्स? बावनकुळेंच्या वक्तव्याने राज्यात खळबळ, VIDEO

Saturday Horoscope : विनाकारण कामांमध्ये येणाऱ्या अडचणीमुळे मनोबल कमी होईल; ५ राशींच्या लोकांना राहावे लागेल सावध

Maharashtra Government : राज्यात बांगलादेशी घुसखोरांना आळा बसणार; फडणवीस सरकारने उचललं मोठं पाऊल

Satara News : डॉक्टर महिलेचे आरोपीसोबत १५० हून अधिक कॉल, आत्महत्येपूर्वी काय घडलं? पोलीस तपासात महत्वाची माहिती समोर

SCROLL FOR NEXT