Cold And Cough google
लाईफस्टाईल

Cold And Cough: थंडीत सर्दी- खोकला अन् तापाच्या समस्या वाढतायेत? मग आत्ताच 'हे' पदार्थ खाणं टाळा

Immunity Boost: हिवाळ्यात सर्दी, खोकला आणि तापाच्या समस्या वाढतात. योग्य आहारासोबत काही पदार्थ टाळल्यास रोगप्रतिकारक शक्ती मजबूत राहते आणि आजारांचा धोका कमी होतो.

Sakshi Sunil Jadhav

सध्या बदलत्या लाइफस्टाइलमुळे अनेकजण पौष्टीक आहारापासून लांब जातात. याचा परिणाम त्यांच्या रोगप्रतिकारक शक्तीवर होतो. यामुळे शरीराला हवे असणारे गुणधर्म मिळत नाहीत. मग शरीर कोणत्याच रोगाची झुंज देऊ शकत नाही. सध्या थंडीचे दिवस सुरु झाले आहेत. या दिवसात सर्दी, खोकला, ताप यांसारख्या आजारांचे प्रमाणही वाढतं. त्यामुळे या दिवसांत रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा आहार घेणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच काही पदार्थ टाळणेही आवश्यक असतं. पुढे आपण याबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत.

केळींचे सेवन

केळी हे आरोग्यासाठी फायदेशीर मानलं जाणारं फळ आहे. मात्र केळी थंड असल्याने थंडीत त्याचं जास्त सेवन केल्याने सर्दी, खोकला आणि घशात खवखव होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे या ऋतूमध्ये केळी कमी प्रमाणात खाणेच योग्य आहे.

संत्री, लिंबू अशी आंबट फळे

संत्री, लिंबू यांसारखी सायट्रस फळं व्हिटॅमिन सीने समृद्ध असतात. तरीही थंडीत या फळांचे अतिसेवन टाळा. जास्त प्रमाणात सायट्रस फळं खाल्ल्याने घशाचा त्रास, सर्दी किंवा खोकला वाढू शकतो.

चहा आणि कॉफी

थंडीच्या दिवसांत चहा आणि कॉफीचे सेवन अनेकजण जास्त करतात. मात्र यामध्ये असलेले कॅफिन शरीरातलं पाणी कमी करू शकतं. शरीर डिहायड्रेट झाल्याने आजारांना आमंत्रण मिळतं आणि रोगप्रतिकारक शक्तीही कमी होऊ शकते.

तेलकट पदार्थ

फार तेलकट, तळलेले आणि जड पदार्थ थंडीत खाल्ल्याने पचनसंस्थेवर परिणाम होतो. योग्य पचन नाही झालं तर शरीर कमकुवत होतं आणि रोगप्रतिकारक शक्तीही कमी होते. त्यामुळे अशा पदार्थांचं सेवन टाळणं गरजेचं आहे. तसेच दारूचे जास्त सेवन केल्यावरही शरीराची आजारांशी लढण्याची ताकद कमी होते. यामुळे सर्दी, ताप किंवा इतर संसर्गजन्य आजार होण्याचा धोका वाढतो.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

2 तासांचा प्रवास आता 7 मिनिटांत होणार; प्रवासाचा वेळ वाचणार, मलंगगडावरील फ्युनिक्युलर ट्रेन सुरू

Maharashtra Live News Update: ओबीसीचे नेते रणांगणात नव्हते म्हणून अजितदादांची राष्ट्रवादी संपली: लक्ष्मण हाके यांची टीका

Frizzy Hair: ड्राय आणि फ्रिझीनेसमुळे केसांची शाईन गेली? वापरा हा होममेड उपाय, आठवड्याभरात दिसेल फरक

महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर फोडाफोडीला सुरुवात? शिंदे गटानंतर ठाकरेंचे ११ नगरसेवक अज्ञातस्थळी

Horoscope Monday: रागावर ठेवा नियंत्रण, 5 राशींना मिळणार नवीन संधी, पैसाही टिकेल; वाचा सोमवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT