Summer Tips: 3 ड्रिंक्स थिअरी नेमकी आहे तरी काय? रखरखत्या उन्हात डिहायड्रेशनची चिंता मिटेल

3 Drink Theory: पानी आपल्या शरिरातून विषारी घटक काढण्याचे काम करते. त्यासाठी एक्सपर्टने ३ ड्रिंक थेरी सांगितल्या आहेत, त्यांना फॉलो करून तुमचे शरिर हायड्रेट राहू शकते.
Summer Drink
3 ड्रिंक्स थिअरी नेमकी आहे तरी काय? रखरखत्या उन्हात डिहायड्रेशनची चिंता मिटेलSaam Tv
Published On

आता उन्हाळा सुरू झाला आहे. या दिवसात शरिराला हायड्रेट ठेवणे गरजेचे असते. या वातावरणात आपल्या शरिरातून घाम निघण्याचं प्रमाण अधिक असते. त्यामुळे शरिर डिहायड्रेट होते. या कोरणास्थ आपल्या शरिरावर वाईट परिणाम होतो. हायड्रेट राहणे म्हणजेच, दररोज पुरेसे पाणी पिणे. जर तुम्हा होयड्रेट राहत असाल तर तुमची किडणी योग्य प्रकारे काम करते.

आपल्या शरीराचे ५०-७० टक्के वजन पाण्यामुळे होते. पेशी ही आपल्या शरीराची इमारत आहे आणि त्यांना जिवंत राहण्यासाठी पाण्याची गरज असते. उन्हाळ्यात स्वतःला हायड्रेट ठेवण्यासाठी थ्री ड्रिंक थेरी फॉलो करू शकता. यामुळे आपल्या शरीराला पोषण तर मिळेलच पण विषारी पदार्थ बाहेर काढण्यासही मदत होईल.

Summer Drink
Summer Drink: उन्हाळ्यात रहाल रिफ्रेश अन् हायड्रेट, फक्त प्या 'हे' थंडगार सरबत

पहिली स्टेप पाणी

दिवसभर किमाण २ ते ३ लिटर पाणी प्यायला हवे. साध्या पाण्यामध्ये शून्य कॅलरी असतात. वेट लॉस करण्यासाठी हे एक उत्तम पर्याय आहे. काही लोकांना साधं पाणी पिणं आवडत नाही. त्यामुळे त्यात बडिसोप, ओवा किंवा लिंबू टाकून ते पिऊ शकता. त्या व्यतिरिक्त तुळशीची पाने, पुदिना किंवा सब्जा घालून देखील पिऊ शकता.

दुसरी स्टेप ज्यूस

थ्री ड्रिंक्स थिअरी सांगते की तुम्ही तुमच्या आहारात फळे आणि भाज्यांचे रस देखील समाविष्ट केले पाहिजेत. उन्हाळ्यात फळांचा किंवा भाज्यांचा रस पियाल्यानं तुमचे शरिर हायड्रेट राहते. अननस, मोसंबी, डाळिंब, पपई आणि आंब्याचं ज्यूस प्यायल्यानं शरिराला खूप सारे व्हिटामिंस आणि मिनिरल्स मिळतात. त्याव्यतिरिक्त तुम्ही टरबूज, खलिंगड, काकडी, द्राक्षे, ब्लूबेरी, मुळा, सफरचंद, टोमॅटो आणि बीटरूट यांसारख्या गोष्टीही कच्च्या खाऊ शकतात.

Summer Drink
Summer Skin Care : उन्हाळ्यात बाहेर जाताना 'ही' गोष्ट करत नसाल तर त्वचेला होतील गंभीर समस्या

तिसरी स्टेप तुमची आवड

तिसऱ्या स्टेपमध्ये तुम्ही तुमच्या आवडीचे ड्रिंक पिऊ शकता. परंतु हे लक्षात ठेवा की तुम्ही चहा आणि कॉफी पिऊ नये. त्यात कॅफिन असते, जे शरिराला डिहायड्रेट करू शकते. मग तुम्ही लस्सी, दूध किंवा नारळ पाणी पिऊ शकता. हे तिन्ही हायड्रेटेड ड्रिंक मानले जतात. जर तुम्हा चहा किंवा कॉफी पित असाल तर दिवसातून दोन कपपेक्षा जास्त पिऊ नये.

Edited By - Purva Palande

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com