Shreya Maskar
उन्हाळ्यात शरीराला थंडावा मिळण्यासाठी बेलाचे सरबत प्या.
बेल फळाचे सरबत बनवण्यासाठी बेल फळ, गूळ, साखर, भाजलेले जिरे, काळे मीठ, लिंबाचा रस, पुदिन्याची पाने, थंड पाणी आणि बर्फाचे तुकडे इत्यादी साहित्य लागते.
बेल फळाचे सरबत बनवण्यासाठी सर्वप्रथम पुदिन्याची पाने धुवून त्यांचे लहान तुकडे करा.
दुसरीकडे बेल फळाचे दोन तुकडे करून त्यातील गर बाहेर काढा.
बेल फळाचा गर मोठ्या बाऊलमध्ये काढून त्यात थोडे पाणी घालून हाताने मॅश करून बिया वेगळ्या करा.
हे मिश्रण छान गाळून बिया काढलेली प्युरी बेल फळाची प्युरी तयार होईल.
गाळलेल्या गरामध्ये साखर, गूळ, लिंबाचा रस, मसाले आणि पुदिन्याची पाने घालून मिक्स करा.
बेल फळाचे सरबत पिताना यात बर्फाचे तुकडे घाला.