Hair care Tips Saam Tv
लाईफस्टाईल

Hair care Tips : केसांमधील उवांच्या समस्येने हैराण झाला आहात? तर घरच्या घरी ट्राय करा हे रामबाण उपाय

Home Remedies : केसांची योग्य पद्धतीने काळजी न घेतल्यास अनेक केसांच्या समस्या निर्माण होतात. अनेक समस्यामध्ये असलेली एक समस्या म्हणजे केसांमध्ये होणारी उवांची समस्या.

Poonam Dhumal

पावसाळ्यात उवांचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो.अनेकदा यामुळे आपल्याला लाजही वाटते.मात्र या उवा वेळीच काढल्या नाहीत तर,त्यांची वाढ होऊन डोक्यात खाज यायला सुरुवात होते.शिवाय अगदी कितीही उवा मारल्या तरी मरत देखील नाही. त्यावर तुम्ही अनेक घरगुती उपाय करु शकता आणि याच उपायांनी उवांची समस्या कमी होण्यासही मदत होते.

ओवा

१० ग्रॅम ओव्यात ५ग्रॅम तुरटीचं मिश्रण करा.हे मिश्रण दही किंवा ताकात कालवून केसांना लावा नंतर केसांची मालिश करा.थोड्यावेळाने केसं धुवा.याने उवा मरून जातात.

लसूण

लसणाच्या पाकळ्या घेऊन त्याची पेस्ट बनवा. पेस्टमध्ये लिंबाच्या रसाचे मिश्रण करून केसांच्या मुळांना लावा. एक-दोन तासाने केस पाण्याने व्यवस्थित धुवा.

कांदा

कांद्याचा रस तुमच्या टाळूला हळूवारपणे लावून मालिश करा...एक तासानंतर सोडा आणि नंतर साध्या पाण्याने स्वच्छ धुवा.असं केल्याने डोक्यातील उवा निघून जातात...

व्हिनेगर

केसांतील उवांवर व्हिनेगरचा वापर करू शकतो.व्हिनेगरचे काही थेंब टाळूला लावल्यास उवां जाऊ शकतात.

कडूलिंब

कडूलिंबाची पानं तेलात उकळून पानांचा रस तयार करून डोक्याला लावा.१०-१५ मिनिटांनंतर केस धुवून टाका.

कापूर

४ ते ५ कापूर घेऊन १ ते २ चमचे खोबरेल तेलात मिक्स करा.कापूर पूर्णपणे विरघळू द्या..नंतर केसांना लावा.रात्रभर राहू द्या.आणि दुसऱ्या दिवशी सकाळी केस धुवा.

हर्बल शॅम्पू

हर्बल शॅम्पूमध्ये नारळाच्या तेलाचे मिश्रण करून केसांना लावा.त्यानंतर केस शॉवर कॅपने झाकून घ्या...थोड्यावेळाने केस धुवा.

(डिस्क्लेमर - सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.)

Edited By: Tanvi Pol

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नो पार्किंग क्षेत्रात कॅबिनेट मंत्र्याची कार; पोलिसांनी क्रेनने उचलून नेली, व्हिडिओ व्हायरल

HSRP नंबरप्लेटसंदर्भात महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, वाहनधारकांना दिलासा; 'या' तारखेपूर्वी करा काम

Nandurbar : चांदसैली घाटात दरड कोसळली; थोडक्यात दुर्घटना टळली

Maharashtra Live News Update: यवतमाळ जिल्ह्यातील तीनशे घरात शिरलं पाणी

Heart blockage symptoms:हार्ट ब्लॉकेज झाल्यावर शरीरात दिसतात ६ मोठे बदल; तुम्हालाही त्रास होत असेल तर सावध व्हा

SCROLL FOR NEXT