Alu Vadi Recipe Saam TV
लाईफस्टाईल

Alu Vadi Recipe : कुरकुरीत आळूवडी घरच्याघरी कशी बनवायची? वाचा सिंपल रेसिपी

Fry Alu Vadi Recipe : तुम्हाला सुद्धा आळूवडी फार आवडत असेल मात्र त्याची परफेक्ट रेसिपी माहिती नसेल तर आज आम्ही तुम्हाला याची रेसिपी सांगणार आहोत.

Ruchika Jadhav

चपाती किंवा वरण आणि भाताबरोबर आळूवडी खायला प्रत्येकाला आवडते. आळूवडीमध्ये वापरले जाणारे मसाले आणि ही पाने आपल्या आरोग्यासाठी फार फायदेशीर आहेत. तुम्हाला सुद्धा आळूवडी फार आवडत असेल मात्र त्याची परफेक्ट रेसिपी माहिती नसेल तर आज आम्ही तुम्हाला याची रेसिपी सांगणार आहोत.

साहित्य

आळूची पाने

बेसन पीठ

मिरची

कोथिंबीर

अद्रक

लसूण

धने

तीळ

तेल

मीठ

हळद

चिंच

गूळ

कृती

सर्वात आधी आळूवडी बनवण्यासाठी आळूची पाने स्वच्छ धुवून घ्या. पाने धुवून त्याच्या मागे असलेल्या शिरा सुरीच्या मदतीने कापून घ्या. त्यानंतर ही पाने एक भांड्यात ठेवून घ्या. आता पुढे मसाला बनवावा लागेल. त्यासाठी एक मिक्सरचे भांडे घ्या. यामध्ये कोथिंबीर, अद्रक, लसूण, धने आणि हिरव्या मिरच्या टाकून चवीप्रमाणे मीठ मिक्स करा.

हे सर्व मिश्रण मिक्सरला अगदी बारीक करून घ्या. त्यानंतर एक वाटीत हे मिश्रण काढून घ्या. तसेच यात वरून तीळ मिक्स करून घ्या. तीळ टाकताना यात हळद सुद्धा मिक्स करा. चवीसाठी तुम्ही यामध्ये चिंच आणि गुळाचे पाणी सुद्धा मिक्स करू शकता. तयार झाला मसाला.

आता एक मोठी परात घ्या किंवा मिथे ताट घ्या. यावर एक पान ठेवा आणि मसाला त्याला लावून घ्या. असे एक एक करून यावर 4 ते 5 पाने एकत्र एकावर एक ठेवून मसाले लावून घ्या. त्यानंतर या पानांचा मस्त गोल रोल करून घ्या. पुढे सर्व रोल एक एक करून एका चाळणीत ठेवा आणि वाफवून घ्या. वाफवून झाल्यावर ते चाळणीतून बाहेर काढा आणि थंड करून घ्या.

त्यानंतर एक एक करून या रोलचे बारीक काप करून घ्या. सर्व बारीक काप एका तव्यावर तेल टाकून फ्राय करा. फ्राय करताना आळूवडी करपण्याची शक्यता असते. त्यामुळे यावेळी गॅस मिडीयम फ्लेमवर ठेवा. तयार झाली तुमची खमंग कुरकुरीत आळूवडी.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुंबईतील विजयी मेळाव्यासाठी नाशिकमध्ये मनसेकडून जोरदार तयारी

Raj & Uddhav Thackeray: ठाकरे बंधूंचा नवा टीझर; मराठी अस्मितेचा बुलंद आवाज पुन्हा दुमदुमला|VIDEO

Devshayani Ekadashi: देवशयनी एकादशीचं काय आहे महत्त्वं? जाणून घ्या पूजेची योग्य वेळ

Satara Crime : घरकाम करणाऱ्या महिलेने मारला डल्ला; दहा तोळे सोने लांबवीले, महिलेला पोलिसांनी केली अटक

Asteroid Scare : कुतुबमिनारपेक्षा ९ पट मोठा लघुग्रह पृथ्वीवर धडकणार | VIDEO

SCROLL FOR NEXT