Foods for constipation: जोर लावूनही शौचाला होत नाही; किचनमधील ४ पदार्थांनी हे दुखणं होईल कायमचं बंद

Foods for constipation: कोणत्याही व्यक्तीला बद्धकोष्ठता म्हणजेच कॉन्स्टीपेशन असणं सामान्य आहे. बद्धकोष्ठतेपासून आराम मिळवण्यासाठी कोणत्या पदार्थांचा आहारात समावेश करू शकता हे जाणून घेऊया.
Foods for constipation
Foods for constipationgoogle
Published On

चुकीच्या जीवनशैलीमुळे आजकाल अनेक आजार आपल्या मागे लागतात. या जीवनशैलीमुळे आपण चमचमीत खाण्याच्या नादात आपण अनेक अनहेल्दी गोष्टी खाऊ लागतो. ज्या व्यक्ती आठवड्यातून ४-५ दिवस बाहेरचे अन्नपदार्थ खातात त्यांना शारीरिक त्रास होण्याची शक्यता वाढते. या समस्यांची सुरुवात बद्धकोष्ठतेपासून होते. कोणत्याही व्यक्तीला बद्धकोष्ठता म्हणजेच कॉन्स्टीपेशन असणं सामान्य आहे. मात्र याला पूर्णपणे बिघडलेली जीवनशैली कारणीभूत आहे.

या समस्येमध्ये पोटात सूज आणि गॅस्ट्रिकचा त्रास होतो. बद्धकोष्ठतेचा त्रास सुरु झाल्यावर पोट दुखते आणि पुन्हा पुन्हा शौच करण्याची इच्छा होते.

तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की, जर एखाद्या व्यक्तीला आठवड्यातून तीन किंवा त्यापेक्षा कमी वेळा मल त्याग करत असेल तर याचा अर्थ त्याला बद्धकोष्ठतेचा त्रास आहे. मलविसर्जनाचा कालावधी वाढवण्यासाठी जीवनशैलीत बदल करणं गरजेचं आहे. बद्धकोष्ठतेपासून आराम मिळवण्यासाठी कोणत्या पदार्थांचा आहारात समावेश करू शकता हे जाणून घेऊया.

अळशीच्या बिया

अळशीच्या बिया आपल्या आतड्याच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतात. यामध्ये अनेक गुणधर्म असतात, ज्यामुळे मलविसर्जन योग्य पद्धतीने होण्यास मदत होते. याच्या सेवनाने खूप चांगले परिणाम मिळू शकतात.

Foods for constipation
Hot Vegetable Soup : सर्दी - खोकला मिनिटांत होईल छुमंतर; पावसाळ्यात प्या हॉट वेज सूप

प्रोबायोटिक्स

प्रोबायोटिक्स हे जिवंत बॅक्टेरिया असतात जे नैसर्गिकरित्या दही, किमचीयांसारख्या पदार्थांमध्ये आढळतात. त्यामुळे पोटाचे कार्य सुधारण्यास मदत होते. त्याचप्रमाणे पचनक्रिया व्यवस्थित राहते.

यापूर्वी केलेल्या अभ्यासात असं आढळून आलं आहे की, प्रोबायोटिक्स आतड्यातील मायक्रोबायोम वाढवतात, जे रोग प्रतिकारशक्ती सुधारण्यास आणि बद्धकोष्ठतेपासून दूर करण्यास मदत करते.

डाळ

आपल्या स्वयंपाकघरात अनेक प्रकारच्या डाळी असून बीन्स, मसूर, चणा डाळ यांच्यामध्ये भरपूर फायबर असते, जे पचन सुधारते आणि बद्धकोष्ठता कमी करण्यास मदत करते. 2017 मध्ये करण्यात आलेल्या अभ्यासामध्ये असं आढळून आलं की, दररोज 100 ग्रॅम कडधान्ये खाल्ल्याने बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो.

Foods for constipation
वजन कमी करायचंय? मग दररोजच्या जीवनात 'हे' बदल ठरतील फायदेशीर

ब्रोकोली

मलविसर्जन योग्य पद्धतीने होण्यासाठी हिरव्या भाज्या हा सर्वोत्तम मार्ग मानला जातो. पालक, ब्रुसेल्स स्प्राउट्स आणि ब्रोकोली यांसारख्या हिरव्या भाज्यांमध्ये पोषक तत्वांसोबत फायबर देखील असतं. ब्रोकोलीचं सेवन करणाऱ्या व्यक्तीला बद्धकोष्ठतेपासून लवकर आराम मिळतो.

2017 मध्ये करण्यात आलेल्या अभ्यासानुसार, निरोगी लोक 4 आठवडे दररोज 20 ग्रॅम ब्रोकोली खातात, त्यांना बद्धकोष्ठतेची समस्या कमी झाल्याचं दिसून आलं.

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com