वजन कमी करायचंय? मग दररोजच्या जीवनात 'हे' बदल ठरतील फायदेशीर

आजकाल प्रत्येकाला फीट आणि फाईन दिसायचं असतं. मात्र चुकीच्या जीवनशैलीमुळे आणि अयोग्य आहारामुळे वजन वाढीची समस्या वाढताना दिसतेय. अशा स्थितीत दररोजच्या जीवनशैलीत काही बदल केल्यास वजन कमी करणं अधिक सोप होऊ शकतं.
lose weight
lose weightyandex
Published On

प्रत्येकालाच आपण फीट असावं, असं वाटत असतं. वजन कमी करण्याच्या नादात अनेकदा आपण आपल्या दिनचर्येत बदल करतो. मग त्यामध्ये व्यायाम आणि आहार योग्य पद्धतीने घेतो. पण तुम्हाला माहित आहे का, जास्त प्रमाणात व्यायाम केल्याने आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. तुम्हाला सुद्धा वजन कमी करायचं आहे तर हे उपाय नक्की करा.

प्रोटीन

सध्याच्या काळात वजन कमी करणं सामान्य उद्दिष्ट आहे. पण जर तुम्ही अधिक प्रमाणात क्रॅश डाएट आणि व्यायाम करत आहात तर ते आरोग्यास हानिकारक ठरू शकते. नियमित व्यायामासोबत संतुलित आहार देखील तितकाच फायदेशीर ठरतो. 'अमेरिकन जर्नल ऑफ न्यूट्रिशन' यांनी प्रकाशित केलेल्या संशोधनात असे आढळून आलं आहे की, एखाद्या व्यक्तीने प्रोटीनचं प्रमाण त्याच्या दैनंदिन कॅलरीजच्या 30% पर्यंत वाढवलं तर यामुळे 12 आठवड्यातच सरासरी 5 किलोग्रॅम पर्यंत वजन कमी करण्यास मदत करते.

योग्य प्रमाणात झोप

भूक आणि चयापचय नियंत्रित करणाऱ्या हार्मोन्सवर नियंत्रण मिळवण्यासाठी झोप महत्त्वाची भूमिका बजावते. कमी झोपेमुळे हार्मोन्सचं संतुलन बिघडते . दररोज 7 ते 8 तास झोप घेणं गरजेचं आहे. यामुळे हार्मोन्स नियंत्रणात राहतात आणि वजन कमी करण्यास फायदेशीर ठरतं.

lose weight
रिकाम्या पोटी की जेवल्यानंतर? वजन कमी करण्यासाठी कोणत्या वेळी चालणं योग्य?

कार्डिओ

कॅलरीज बर्न करण्यासाठी कार्डिओ हा उत्तम मार्ग आहे. जेवढ्या प्रमाणात कार्डिओ करतो तेवढ्या अधिक कॅलरीज बर्न होतात. त्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते. 'जर्नल ऑफ फिजियोलॉजी' मध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, एरोबिक व्यायाम करणं वजन कमी करण्यासाठी उपयुक्त समजलं जातं.

सतत एक्टिव्ह राहा

रोजच्या जीवनशैलीमध्ये व्यायाम महात्त्वाचा असला तरी एक्टिव्ह राहणं गरजेचं आहे. यामुळे कॅलरीज बर्न होण्यास मदत होते. यामुळे वजन कमी होण्यामध्ये लक्षणीय बदल दिसून येतो.

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com