Baba Vanga Prediction 2026 saam tv
लाईफस्टाईल

Baba Vanga: 2026 मध्ये पृथ्वीवर होणार एलियन्सची एन्ट्री? बाबा वेंगांच्या भाकिताने शास्त्रज्ञही चकित

Baba Vanga Prediction 2026: बल्गेरियाच्या गूढवादी भविष्यवेत्ती बाबा वेंगा यांनी केलेल्या २०२६ सालासाठीच्या काही भविष्यवाण्यांनी जगभरात खळबळ उडवून दिली आहे. त्यांच्या अनेक भविष्यवाण्या भूतकाळात खऱ्या ठरल्याचा दावा त्यांच्या अनुयायांनी केला आहे.

Surabhi Jayashree Jagdish

बुल्गेरियातील प्रसिद्ध भाकितं वर्तवणारे बाबा वेंगा यांनी त्यांच्या भविष्यवाण्यांमुळे संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेतलं. त्या दृष्टिहीन होत्या तरीही त्यांच्या अनेक भविष्यवाण्या इतक्या अचूक ठरल्या की त्यांची चर्चा आजही जगभरात केली जाते. 1996 साली त्यांचं निधन झालं मात्र त्यानंतरही त्यांच्या केलेल्या भाकितांनी लोकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण केली आहे.

2026 वर्षाबद्दलही बाबा वेंगा यांनी काही अशा भविष्यवाण्या केल्या आहेत ज्या काहीशा चिंताजनकही मानल्या जातात. या भाकितांमध्ये एलिएन्सशी संपर्क, विनाशकारी नैसर्गिक आपत्ती आणि जागतिक संघर्ष यांसारख्या गंभीर घटनांचा उल्लेख करण्यात आला आहे. ज्यामुळे भविष्यकाळात अनेक प्रकारच्या अडचणी आणि संकटांचा सामना मानवजातीला करावा लागू शकतो.

जरी अनेक लोक या भविष्यवाण्यांना फारसं गांभीर्याने घेत नसलं तरीही वेंगा यांची अनेक भाकितं खरी ठरली आहेत. म्हणूनच या भाकितांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करणं योग्य ठरणार नाही. 2026 वर्षासाठी बाबा वेंगा यांनी केलेल्या काही प्रमुख भविष्यवाण्यांवर सविस्तर नजर टाकूया.

विनाशकारी नैसर्गिक आपत्ती

बाबा वेंगा यांनी 2026 मध्ये भूकंप तसंच ज्वालामुखीचे उद्रेक आणि पूर यांसारख्या मोठ्या नैसर्गिक आपत्तींची शक्यता वर्तवली आहे. त्यांच्या मते, पृथ्वीवर हवामानातील तीव्र बदलांसह विनाशकारी स्वरूपाच्या घटनांचा अनुभव येऊ शकतो. मोठमोठ्या ज्वालामुखींचे उद्रेक, तीव्र भूकंप आणि मुसळधार पावसामुळे निर्माण होणारे पूर यांचा परिणाम अनेक देशांना भोगावा लागू शकतो. अशा घटना लोकांनी केवळ ‘भविष्यवाणी’ म्हणून न पाहता ‘चेतावणी’ म्हणून गांभीर्याने घेणं गरजेचं आहे.

जागतिक संघर्षाची शक्यता

बाबा वेंगा यांनी त्यांच्या भाकितांमध्ये तिसऱ्या महायुद्धाचीही शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मोठ्या राष्ट्रांमध्ये संघर्षाची परिस्थिती निर्माण होऊ शकते, असं त्यांनी सूचित केलंय. यात रशिया आणि अमेरिकेसारख्या महासत्तांचा सहभाग असू शकतो. याशिवाय मध्य पूर्व, आग्नेय आशिया आणि दक्षिण आशियातील वाढता तणावही जागतिक पातळीवर गंभीर संघर्षाला कारणीभूत ठरू शकतो.

एलियन्सशी होणार संपर्क?

एलियन्सशी संपर्क हा सध्या अशक्य गोष्ट वाटतेय. पण बाबा वेंगा यांच्या मते 2026 हे वर्ष या दृष्टीने ऐतिहासिक ठरू शकतं. त्यांच्या भविष्यवाणीनुसार, मानव पहिल्यांदाच एलियन्सशी थेट संपर्क साधू शकते. त्यांनी पृथ्वीच्या वातावरणात एक मोठं अवकाशयान प्रवेश करेल, अशी भविष्यवाणी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Traffic : मुंबईकरांचा प्रवास आता सुखकर होणार! वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महापालिकेचा मास्टर प्लॅन

Maharashtra Live News Update : खड्ड्यांमुळे अपघात झाल्यास ठेकेदार अन् संबंधित महापालिका अधिकाऱ्यांच्या पगारातून दंड वसुली

Rohit Sharma: मोठी बातमी! रोहित शर्माचे कर्णधारपद काढलं, गिलकडे नवी जबाबदारी, ऑस्ट्रोलिया दौऱ्यात भारतीय संघात मोठे बदल

Anarsa Recipe: दिवाळीनिमित्त घरच्याघरी बनवा तांदळाच्या पिठाचे खुसखुशीत अनारसे

Hair Care: टक्कल पडण्याच्या भीतीने रात्रीची झोप उडालीये? मग हा १ घरगुती उपाय कराच

SCROLL FOR NEXT