Baba Vanga: एलियन्स येणार पृथ्वीवर, AI चा कब्जा आणि...; बाबा वेंगाची थरकाप उडवणारी भविष्यवाणी

Baba Vanga prophecy alien AI: आता बाबा वेंगाच्या काही नव्या आणि भयानक भविष्यावाण्या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत, ज्यात एलियनचे पृथ्वीवर आगमन, एआयचा ताबा आणि मानवासाठीच्या मोठ्या धोक्यांचा उल्लेख आहे.
Baba Vanga prophecy alien AI
Baba Vanga prophecy alien AIsaam tv
Published On

लोकांना नेहमीच भविष्याबद्दल उत्सुकता असते पुढे काय होणार, जगात कोणते बदल घडणार, संकटं येणार की काही दुसरं घडणार? इतिहासात अनेक अशा व्यक्ती होऊन गेल्या ज्यांच्या भविष्यवाण्यांवर लोकांनी विश्वास ठेवला, त्यातील एक महत्त्वाचं नाव म्हणजे बाबा वेंगा. त्यांना बाल्कनचा नास्त्रेदमस म्हटलं जातं. त्यांच्या अनेक भविष्यवाण्या खरं ठरल्यामुळे त्यांच्याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलेलं आहे.

2025 मध्ये त्यांनी मोठ्या आपत्तींचा इशारा दिला होता आणि आता 2026 साठी त्यांच्या काही भयानक भविष्यवाण्या समोर आल्या आहेत. त्यांची ही भाकितं ऐकून अनेकांचा थरकाप उडाला आहे. चला जाणून घेऊया 2026 साठी त्यांनी काय भाकीत केलं आहे.

2026 मध्ये नैसर्गिक आपत्तींचं थैमान

बाबा वेंगांच्या मते, 2026 हे वर्ष खूपच संकटमय ठरू शकतं. यावेळी त्यांनी मोठा भूकंप, ज्वालामुखीचे स्फोट आणि धोकादायक हवामानाच्या घटनांची शक्यता वर्तवली आहे. यामुळे पृथ्वीचा 7 ते 8 टक्के भूभाग प्रभावित होणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. जरी त्यांनी सुरुवात कुठून होईल हे स्पष्ट केलं नसलं, तरी अनेकांना वाटतं की त्याचे संकेत आपल्याला आधीच दिसू लागलेत.

Baba Vanga prophecy alien AI
Baba Vanga: बाबा वेंगा यांची फोनबाबत हादरवून टाकणारी भविष्यवाणी; वाचून प्रत्येकाचीच झोप उडेल

तिसऱ्या महायुद्धाचा धोका?

2026 मध्ये तिसरं महायुद्ध होऊ शकतं असंही बाबा वेंगांचं भाकीत केल्याची माहिती आहे. 2025 मध्ये जगभरात भारत-पाकिस्तान, इराण-इस्त्राइल, थायलंड-कंबोडिया यांच्यातील तणाव दिसून आला. त्या पार्श्वभूमीवर वेंगांच्या म्हणण्यानुसार, चीन तैवानवर हल्ला करू शकतो, तर रशिया आणि अमेरिका यांच्यात थेट संघर्ष होण्याची शक्यता आहे. जर हे खरं ठरलं, तर 2026 हे वर्ष अत्यंत धोकादायक ठरू शकतं.

AI चा उदय

बाबा वेंगांनी 2026 मध्ये AI चा उदय होईल असं सांगितलं आहे. 2025 मध्येच AI ची प्रगती मोठ्या प्रमाणात होताना दिसतेय. यामुळे माणसांसारख्या आवाजात बोलणं, मोठे निर्णय घेणं, या सगळ्या गोष्टी आता शक्य झाल्या आहेत. काहींना ही प्रगती वाटत असली, तरी काहीजण खूप चिंतेत आहेत. कारण AI हळूहळू अनेक ठिकाणी माणसांचं काम आता AI करू लागल्याने नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत.

Baba Vanga prophecy alien AI
Baba Vanga Scary Predictions: जगाचा विनाश, मोठं युद्ध आणि...; बाबा वेंगा यांनी २०२५ बाबत काय भविष्यवाणी केली, पाहा

एलियनशी संपर्क?

बाबा वेंगांच्या सर्वात विचित्र आणि चर्चेत असलेल्या भविष्यवाण्यांपैकी एक म्हणजे एलियनशी संपर्क. त्यांच्या मते, नोव्हेंबर 2026 मध्ये एक विशाल एलियन यान पृथ्वीच्या दिशेने येणार आहे. काही जणांना हे विज्ञानाच्या दृष्टीने एक मोठा शोध वाटतो म्हणजेच अंतराळात जीवन आढळण्याची शक्यता आहे. तर काही जणांना हे धोक्याचं लक्षण वाटतं.

Baba Vanga prophecy alien AI
Baba Vanga : बाबा वेंगाच्या Double Fire च्या भविष्यवाणीने उडेल थरकाप; ऑगस्टमध्ये काहीतरी मोठं घडण्याचं भाकित

हार्वर्ड युनिव्हर्सिटीचे खगोलशास्त्रज्ञ एव्ही लोएब यांच्या मते, 3I/ATLAS नावाची एक अवकाशीय वस्तू पृथ्वीच्या खूप जवळून जातेय. काही वैज्ञानिक म्हणतात की, तो एक बर्फाळ धूमकेतू आहे पण लोएब आणि त्यांच्या टीमचं म्हणणं आहे की ती एलियन टेक्नोलॉजी असू शकते, जी भविष्यात पृथ्वीसाठी धोका बनू शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com