Baba Vanga Prediction: दोन महिन्यात भारतात महापूर,भूस्खलन व तापमान वाढ; कोणी दिला इशारा?

India Disaster Forecast: बाबा वेंगाची आणखी एक धक्कादायक भविष्यवाणी समोर आलीय..मात्र या भविष्यवाणीमुळे भारताचं टेंशन वाढलंय. बाबा वेंगानं भारताबद्दल नेमकी काय भविष्यवाणी केली? भारताचं टेंशन का वाढलंय?
Baba Vanga’s latest prediction warns of massive disasters in India within two months.
Baba Vanga’s latest prediction warns of massive disasters in India within two months.Saam Tv
Published On

बॅगा भरा, आणि डोंगरावर राहायला चला. होय. बाबा वेंगाची पुढील वर्षीची भविष्यवाणी ऐकली की तुम्ही तयारीला लागाल. होय होय होय.. बाबा वेंगानं आतापर्यंतची सर्वात मोठी आणि सर्वात भयावह भविष्यवाणी केलीये. अगदी २ महिन्यात जग विध्वंसाच्या उंबरठ्यावर उभं राहणार आहे. 2026 ला जगभरात हाहाकार माजणारेय. बाबा वेंगानं पुढच्या वर्षीसाठी काय भविष्यवाणी केलीये.

तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटणार

जगातील बड्या राष्ट्रांमध्ये तणाव वाढणार

चीन तैवानला गिळंकृत करण्याचा प्रयत्न करणार

तर ही होती जगासाठी भविष्यवाणी. जगावर संकट आहेच पण आपल्या भारतात काय होणार तर पाहा बाबा वेंगाने आपल्या भारतात बाबत काय म्हटलंय.

भारतावर नैसर्गिक आपत्ती येणार

भारतातील अनेक भागात महापूर

जमीन खचेल, भूस्स्खलन होणार

तापमानात कमाल वाढ होणार

अनेक शहरात पाणी कपातीचे संकट

देशात याच वर्षी अनेक नैसर्गिक आपत्ती आल्या. त्यामध्ये वायनाडमध्ये झालेलं भूस्खलन, काश्मिर मध्ये आलेला महापूर, . उत्तराखंडमध्ये झालेली ढगफुटी आणि हिमस्खलन, पंजाब आणि महाराष्ट्रात झालेली अतिवृष्टी यामुळे देशभरातील नागरिक धास्तावलेले आहेत. त्यात आता पुन्हा अवघ्या दोन महिन्यात पुन्हा संकट येणार असल्याच्या बाबा वेंगाच्या भविष्यवाणीनं पुन्हा टेन्शन वाढवलंय. बाबा वेंगाची भविष्यवाणी या आधी खरी ठरल्याचा दावा अनेकांनी केलाय. मात्र येणाऱ्या वर्षात बाबा वेंगाची ही भविष्यवाणी खोटी ठरो अशीच प्रत्येकाची इच्छा आहे..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com