Area 51 saam tv
लाईफस्टाईल

'या' गुप्त जागी ठेवलाय Alien चा मृतदेह? रहस्यमयी पद्धतीने संशोधन होत असल्याचा दावा!

Area 51: एरिया ५१ या जागेचं नाव तुम्ही ऐकलं आहे का? हे एक रहस्यमयी ठिकाण असून हे ठिकाण लास वेगासपासून काही अंतरावर आहे. असं म्हटलं जातं की, या ठिकाणी अमेरिका एलियन्स पकडून संशोधन करतंय.

Surabhi Jagdish

पृथ्वी सोडून कोणा एका दुसऱ्या ग्रहावर एलियंस आहेत, ते अनेकदा पृथ्वीवरही येतात, असं यापूर्वी आपण अनेकदा ऐकलं असेल. मात्र खरंच एलियन्स आहेत का, हा प्रश्न अजूनही सर्वांमध्ये आहे. त्यांचं जीवन कसं आहे, ते नक्की काय करतात, हे प्रश्न अजूनही एक रहस्यचं आहेत. असंच एक एलियन्सबाबतचं एक रहस्य तुम्हाला माहिती आहे का?

एरिया ५१ या जागेचं नाव तुम्ही ऐकलं आहे का? हे एक रहस्यमयी ठिकाण असून हे ठिकाण लास वेगासपासून काही अंतरावर आहे. हे ठिकाण एरिया 51 म्हणून प्रसिद्ध आहे. असं म्हटलं जातं की, या ठिकाणी अमेरिका एलियन्स पकडून संशोधन करतंय. या ठिकाणाचं रहस्य काय आहे? ते जाणून घेऊया.

काय आहे एरिया ५१ ही जागा

याबाबत कोणत्याही प्रकारचा फोटो अद्याप समोर आलेला नाही. गुगल मॅपवर या ठिकाणाचं काही फोटो आहेत. असं म्हटलं जातं की, एरिया 51 हे असं ठिकाण आहे, ज्या ठिकाणी अनेक हेरगिरीची कामं केली जातात. शस्त्रं, विमानं अशा शस्त्रांची चाचणी घेतली जाते.

एरिया 51 नेवाडाच्या दक्षिण भागात लास वेगासच्या वायव्येला आहे. ही जागा नेहमीच गुप्त ठेवण्यात आली होती. कॉन्सपिरेसी थिअरीचा असा विश्वास आहे की, या तळाचा वापर क्रॅश झालेल्या एलियन विमानाची साठवण, चाचणी आणि दुरुस्ती करण्यासाठी केला जातो. 1950 साली झालेल्या रोझवेल दुर्घटनेचं साहित्यही ठेवण्यात आलंय.

खरंच एलियन्सवर केलं जातं संशोधन?

सन 2023 मध्ये, यूएस एअर फोर्सचे माजी गुप्तचर अधिकारी डेव्हिड ग्रश यांनी एक धक्कादायक खुलासा केला होता. त्यांच्या म्हणण्यांनुसार, 1930 नंतर अमेरिकेकडे असं खास तंत्रज्ञान आहे ज्याद्वारे ते रिव्हर्स इंजिनीअरिंग करण्याचा प्रयत्न सुरू करतील. याशिवाय अमेरिकेतही एलियनचा मृतदेह असल्याचंही त्यांनी सांगितलं. ज्यावर संशोधन सुरू आहे. गुप्तचर अधिकाऱ्यांच्या दाव्याबाबत अद्याप कोणताही पुरावा समोर आलेला नाही.

हिस्ट्री डॉट कॉमच्या रिपोर्टनुसार, रॉसवेल्झ यूएफओ क्रॅशमध्ये मृत्यू झालेल्या एका एलियनचा मृतदेह या ठिकाणी ठेवण्यात आला असल्याची कथित चर्चा आहे. 1989 मध्ये रॉबर्ट लेजर नावाच्या व्यक्तीने एलियन 51 मध्ये एलियन तंत्रज्ञानावर काम करत असल्याचा दावा केला होता. मृत एलियनचे फोटोही पाहिल्याचा दावाही त्यांनी केला होता. मात्र याबाबत कोणताही पुरावा नसल्याने यावर विश्वास ठेवणं कठीण आहे.

डिस्क्लेमर- या लेखामध्ये दिलेल्या गोष्टी सामान्य माहितीच्या आधारावर आहे. साम टीव्ही याची खातरजमा करत नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: भाजपचा मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांना पाठिंबा

Uddhav Thackeray: पीएम मोदींच्या अशुभ हातांनी बांधलेला पुतळा पडला'; उद्धव ठाकरेंची टीका

Bullet Train Bridge Collapsed: बुलेट ट्रेन प्रकल्पाचा निर्माणाधीन पूल कोसळला; अनेक कामगार मलब्याखाली दबले

Assembly Election: मनोज जरांगे पाटलांनी रयतेतल्या मराठ्यांचा बळी दिला: प्रकाश आंबेडकर

Virat Kohli Birthday : 'बापमाणूस' विराट कोहली! पत्नी अनुष्काचा प्रेमवर्षाव, नवऱ्यासाठी खास पोस्ट

SCROLL FOR NEXT