Air Pollution Affect Fertility Saam Tv
लाईफस्टाईल

Air Pollution Affect Fertility : वाढत्या प्रदूषणांचा महिलांच्या प्रजनन क्षमतेवर होतोय परिणाम? तज्ज्ञांनी दिला सतर्कचे इशारा

Air Pollution Side Effects : वाढत्या प्रदूषणाचा हवेवर नाही तर माणसाच्या आरोग्यावर देखील परिणाम होताना दिसून येत आहे.

कोमल दामुद्रे

Air Pollution vs Fertility :

वाढते प्रदूषण आणि दिवाळीत फोडल्या जाणाऱ्या फटाक्यांमुळे दिल्लीसह मुंबई,पुणे आणि नाशिकमधील हवेची गुणवत्ता खालवली आहे. हवा खराब होत असल्याने फटाके फोडण्यावर न्यायालयाने निर्बंध घातले आहे.

असे असतानाही अनेक राज्यात दिवाळी सारख्या सणानिमित्त आतेषबाजी पाहायला मिळाली. वाढत्या प्रदूषणाचा हवेवर नाही तर माणसाच्या आरोग्यावर देखील परिणाम होताना दिसून येत आहे. हवेत पसरलेले धूळीचे कण श्वसनामार्गे शरीरात पोहोचतात. त्यामुळे श्वास घेण्यास त्रास होणे, डोळ्यांची जळजळ, सर्दी-खोकल्यासारख्या आजाराचा सामना करावा लागत आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अशातच अभ्यासातून असे समोर आले आहे की, हवेतील प्रदूषणातील सूक्ष्म कण आणि विषारी रसायनांच्या संपर्कात आल्याने महिलांच्या प्रजनन क्षमतेवर विपरीत परिणाम होत आहे. वायू प्रदूषणाची वाढती पातळी स्त्रियांच्या आरोग्यावर परिणाम करत आहे. याबाबतची माहिती दिली आहे डॉ. रितू सेठी, सहयोगी संचालिका-गुरुग्राममधील मॅक्स हॉस्पिटलमधील स्त्रीरोग आणि गुरुग्राममधील ऑरा स्पेशॅलिटी क्लिनिकच्या संस्थापक यांनी प्रजननक्षमतेशी संबंधित काही महत्त्वाचे मुद्दे मांडले आहे.

हिंदूस्तान टाइमच्या वृत्तानुसार असे म्हटले आहे की, वाढत्या प्रदूषणामुळे (Pollution) अनियमित मासिक पाळी, प्रजनन क्षमता कमी होणे आणि गर्भपात होण्याचा धोका महिलांमध्ये (Women) वाढतो.

प्रजनन क्षमतेसाठी स्त्रियांना स्वच्छ हवेची गरज असते. परंतु, वाढत्या प्रदूषणामुळे त्यांना अनेक आजारांना (Disease) बळी पडावे लागत आहे.

हवेतील प्रदूषणामुळे हार्मोनल असंतुलित होऊन पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम (पीसीओएस) आणि एंडोमेट्रिओसिस सारख्या आजारांचा त्रास सहन करावा लागतो.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : निलेश गायवळ यावर आत्तापर्यंत १० गुन्हे दाखल

Maharashtra Rain Alert : दिवाळीवर पावसाचे सावट, पुढील काही दिवस राज्यात कोसळधारा, 'या' जिल्ह्यांना IMD नं दिला इशारा

Gulab Jamun Recipe : सणासुदीला खास बनवा रताळ्याचे गुलाबजाम, १० मिनिटांत खाण्यासाठी तयार

Transferred : ऐन दिवाळीत पुणे महापालिकेत खळबळ, सहाय्यक आयुक्तांची उचलबांगडी, तिघांचे निलंबन, नेमकं प्रकरण काय?

Bank Holidays: सोमवारी बँका बंद की सुरू राहणार? वाचा आठवडाभराच्या सुट्ट्यांची यादी

SCROLL FOR NEXT