How air pollution causes cardiovascular diseases and kidney damage  saam tv
लाईफस्टाईल

Air Pollution : विषारी हवेमुळे हृदय, मेंदू आणि किडनीवर होतोय गंभीर परिणाम; डॉक्टरांचा गंभीर इशारा

TOXIC AIR CRISIS : हवेतील विषारी कण केवळ फुफ्फुसांनाच नाही, तर रक्तप्रवाहाद्वारे हृदय, मेंदू आणि किडनीलाही गंभीर इजा पोहोचवत आहेत. प्रदूषणाच्या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर डॉक्टरांनी आरोग्य समस्येबाबत सतर्कतेचा इशारा दिला आहे.

Saam TV News

दरवर्षी हिवाळ्याची सुरुवात होत असताना वाढणारे प्रदूषण ही एक मोठी चिंतेची बाब बनली आहे. या प्रदूषणाचा परिणाम केवळ फुफ्फुसांवरच होतो असे नाही, तर त्याचा धोका हृदय आणि मेंदूवरही सतत वाढत चालला आहे.

हवेमध्ये उपस्थित असलेले अतिसूक्ष्म कण श्वासावाटे फुफ्फुसांच्या खोलापर्यंत पोहोचतात. हे अतिसूक्ष्म कण रक्तप्रवाहात प्रवेश करून शरीरात जळजळ आणि ऑक्सिडेशनचा ताण वाढवू शकतात. यामुळे रक्तवाहिन्यांच्या कार्यप्रणालीवर परिणाम होतो आणि हृदयविकार, हार्ट अटॅक तसेच स्ट्रोकचा धोका वाढतो.

डॉक्टरांच्या मते, हृदय, मेंदू आणि इतर अवयवांपर्यंत पोहोचतेय प्रदूषणमधील अतिसूक्ष्म प्रदूषक कण फुफ्फुसांमध्ये पोहोचल्यानंतर रक्तप्रवाहाच्या माध्यमातून शरीराच्या इतर अवयवांपर्यंतही पोहोचत आहेत. याचा थेट प्रभाव हृदय, रक्तवाहिन्या, किडनी आणि पचनसंस्थेवर पडत आहे. यामुळेच दमा, सीओपीडी आणि हार्ट अटॅकच्या समस्या होण्याची शक्यता असते.

वाढते प्रदूषण म्हणजे आणीबाणीची परिस्थिती

डॉक्टरांनी सांगितल्यानुसार प्रदूषणामुळे हृदय, मेंदू यांसह शरीराच्या इतर यंत्रणांवरही विपरीत परिणाम होत आहेत. गेल्या वर्षी दिवाळीनंतर श्वास घेण्याच्या त्रासामुळे त्रस्त असलेल्या रुग्णांच्या संख्येत सुमारे १५ टक्क्यांपर्यंत वाढ नोंदवली गेली होती. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, दिल्लीतील एम्स, सफदरजंग, डॉ. राम मनोहर लोहिया रुग्णालय, लेडी हार्डिंग मेडिकल कॉलेज, राष्ट्रीय क्षयरोग व श्वसन रोग संस्था आणि वल्लभभाई पटेल चेस्ट इन्स्टिट्यूटमध्ये २०२२ ते २०२४ या कालावधीत श्वासोच्छवासाच्या गंभीर आजारांनी ग्रस्त २,०४,७५८ हून अधिक रुग्ण आपत्कालीन विभागात पोहोचले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

काकडी सोलून की सालीसकट कशी खावी? जाणून घ्या योग्य पद्धत

Express Train : महाराष्ट्राला मिळाली आणखी एक नवीन एक्स्प्रेस; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

Maharashtra News Live Update: धुळ्यात शेतकऱ्याचे कापूस विक्रीचे पैसे लुटल्याप्रकरणी दोघांना अटक

या फोटोमध्ये किटली कुठे आहे? १० मिनिटांत शोधून दाखवा

डिलिमिटेशन बिलावर ठाकरेसेना काय निर्णय घेणार? खासदाराच्या व्यक्तव्याने संभ्रम वाढला

SCROLL FOR NEXT