SBI Bank Saam TV
लाईफस्टाईल

SBI Bank : रेपो दरात वाढ झाल्यानंतर या बॅंकेने घेतला मोठा निर्णय; सामान्य नागरिकांची चिंता वाढणार

महागाई नियंत्रीत करण्यासाठी आरबीआयने रेपो दरात एकाच वर्षात तब्बल ५ वेळा वाढ केली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Bank Investment: देशात महागाईचा भडका उडत चालला आहे. सातत्याने रेपो दरात वाढ होत आहे. सर्वसामान्य प्रत्येक नागरिक घर, गाडी अशा वस्तू कर्ज काढून खरेदी करत असतात. दर महा त्यांच्या पगारातील काही टक्के रक्कम ईएमआय स्वरूपात बॅंकेत जमा होते. अशात रेपो रेट वाढल्याने ईएमआयचा बोजा देखील वाढला आहे. तसेच यात आता स्टेट बॅंक ऑफ इंडियाने देखील नागरिकांना मोठा घक्का दिला आहे. (latest Marathi News)

SBI चा सर्वसामान्यांना मोठा धक्का

स्टेट बॅंक ऑफ इंडियाने (SBI) आता MCLR मध्ये वाढ केली आहे. नुकतेच आरबीआयने (RBI) त्यांच्या रेपो दरात वाढ केली. यात आता MCLR मध्ये ०.२५ टक्के हणजेच २५ आधार अंकांची वाढ झाली आहे. एसबीआयने घेतलेल्या या निर्णयामुळे सामान्य माणसाला अधिक अडचणींचा सामना करावा लागणार आहे. यात तुमचे गृह कर्ज, वाहन कर्ज, खाजगी कर्ज अशा सर्व प्रकारच्या कर्जाला जास्तीचा इएमआय भरावा लागणार आहे.

या तारखेपासून नवीन दर लागू

  • एसबीआयचे सर्व बदल १५ डिसेंबर पासून लागू करण्यात येत आहेत.

  • यात MCLR ७.६० टक्क्यांपरून ७.८५ टक्क्यांवर पोहचला आहे.

  • १ ते ३ महिन्यांच्या कालावधीसाठी MCLR ७.७५ टक्क्यांवरून ८ टक्क्यांपर्यंत पोहचला आहे.

  • तसेच ६ महिन्यांपासून ते १ वर्षासाठी MCLR ८.०५ टक्क्यांवरून ८.३० टक्क्यांवर पोहचला आहे.

  • दोन ते तीन वर्षांसाठी MCLR ८.३५ टक्क्यांवरून ८.६० टक्के झाला आहे.

एकाच वर्षात सलग ५ वेळा रेपो दरात वाढ

महागाई नियंत्रीत करण्यासाठी आरबीआयने रेपो दरात एकाच वर्षात तब्बल ५ वेळा वाढ केली आहे. मे महिन्यात रेपो रेट २,२५ टक्क्यांनी वाढवण्यात आला होता. त्यानंतर नोव्हेंबर पर्यंत रेपो रेट ६.२५ टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आला आहे.

आरबीआयने रेपो दरात वाढ केल्यावर याचा थेट परिणाम आपल्या कर्जाच्या व्याजावर होतो. आरबीआय बॅंकेला कर्ज स्वरूपात जे पैसे पुरवते त्यात बॅंकेकडून रेपो रेट आकारला जातो. त्यामुळे जर रेपो रेट वाढला तर बॅंकेला आरबीआयला जास्तीचे पैसे भरावे लागतात. परिणामी सामान्य ग्राहकांच्या व्याजाचे दर देखील वाढले जातात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Tourism: महाराष्ट्राच्या 'या' जिल्ह्यात आहे सर्वात छोटं हिल स्टेशन; सौंदर्य तुम्हालाही पाडेल भूरळ

World Hepatitis Day: हिपॅटायटीस टाळण्यासाठी हे सोपे उपाय नक्की करा

Parliament Monsoon Session: 'ऑपरेशन सिंदूर' का थांबवलं? परत सुरू होणार का ऑपरेशन? संरक्षण मंत्र्यांनी लोकसभेत दिलं उत्तर

Kalyan : बनावट फोटो लावून जमिनीचा डेव्हलपमेंट करार, ११ जणांवर गुन्हा दाखल; कल्याणमध्ये धक्कादायक प्रकार

Roshani Walia : 'सन ऑफ सरदार २' मध्ये झळकणारी रोशनी वालिया कोण आहे?

SCROLL FOR NEXT