HMPV Cases Surge saam tv
लाईफस्टाईल

HMPV outbreak: चीननंतर आता 'या' देशात HMPV व्हायरसने घातलं थैमान; रूग्णालयात लांब रांगा, आरोग्य मंत्रालयाकडून इशारा

HMPV Cases Surge : ह्युमन मेटापन्यूमोव्हायरस असं या व्हायरसचं नाव असून चीनमध्ये याची प्रकरणं वाढतायत. दरम्यान चीननंतर अजून एका देशात या व्हायरसचा प्रसार होतोय.

Surabhi Jayashree Jagdish

गेल्या काही दिवसांपासून चीनमध्ये एका नव्या व्हायरसने थैमान घातलं आहे. ह्युमन मेटापन्यूमोव्हायरस असं या व्हायरसचं नाव असून चीनमध्ये याची प्रकरणं वाढतायत. अशातच हा व्हायरस आता चीनसह अजून एका देशात पसरला आहे. चीननंतर मलेशियामध्ये आता या व्हायरसचे रूग्ण दिसून आले आहेत.

चीनमध्ये ह्युमन मेटापन्यूमोव्हायरस (एचएमपीव्ही) ची प्रकरणं वाढल्यानंतर आता मलेशियामध्येही या व्हायरसने चिंता वाढवली आहे. मलेशियाच्या आरोग्य मंत्रालयाने देशात एचएमपीव्ही संसर्गाच्या प्रकरणांमध्ये वेगाने वाढ झाल्याची खात्री केली आहे. रुग्णालयात रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली असून त्यामुळे आरोग्य सेवेवर ताण वाढत असल्याचं मलेशियन सरकारने म्हटलं आहे.

HMPV व्हायरस काय आहे?

एचएमपीव्ही हा श्वसन संसर्गाचा एक प्रकार आहे. या व्हायरसचा अधिक परिणाम लहान मुलं, वृद्ध आणि कमकुवत प्रतिकारशक्ती असलेल्या लोकांवर वेगाने होतो. त्याची लक्षणं साधारणपणे फ्लूसारखी असतात. ज्यामध्ये ताप, घसा खवखवणं, खोकला आणि श्वास घेण्यात अडचण येणं यांचा समावेश असतो. हा व्हायरस गंभीर प्रकरणांमध्ये न्यूमोनिया आणि ब्राँकायटिस होऊ शकतो.

मलेशियामध्ये वाढतायत रूग्ण

मलेशियाच्या आरोग्य मंत्रालयाने तिथल्या लोकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे. त्यांनी सांगितलं की, अलिकडच्या आठवड्यात HMPV संसर्गाच्या प्रकरणांमध्ये अचानक वाढ झाली आहे. रूग्णालयांमध्ये लहान मुलं आणि वृद्ध रूग्णांची संख्या झपाट्याने वाढतायत. त्यापैकी अनेकांना श्वासोच्छवासाचा गंभीर त्रास होत असून यामुळे रूग्णांची संख्या वाढतेय.

लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका

  • सततचा ताप

  • खोकला

  • घसा खवखवणं

  • श्वास घेण्यास त्रास होणं

  • थकवा आणि अशक्तपणा

आरोग्य मंत्रालयाचं नागरिकांना आवाहन

मलेशियाच्या आरोग्य मंत्रालयाने लोकांना गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळण्यास सांगितलं आहे. यावेळी नागरिकांना वैयक्तिक स्वच्छतेची विशेष काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. मास्क घालण्याचा आणि नियमित हात धुण्याचा सल्ला सर्वांना देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे मुलं आणि वृद्धांना घरातच राहणाचा सल्ला दिलाय जेणेकरून त्यांना या व्हायरसची लागण होणार नाही.

कोरोनानंतर जगासाठी धोक्याचा इशारा?

चीनमध्ये HMPV प्रकरणं आधीच वाढत असल्याचं चित्र आहे. अशातच आता मलेशियामध्ये या व्हायरसचा उद्रेक जागतिक आरोग्य तज्ञांसाठी चिंतेचा विषय बनतोय. हा व्हायरस झपाट्याने पसरणार असून यावर नियंत्रण मिळवले नाही तर कोविड-19 सारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते, असंही काही तज्ज्ञांचं मत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mangal Gochar 2025: सप्टेंबर महिन्यात पालटणार 'या' राशींचं नशीब; मंगळाच्या गोचरने होणार लाभ

Maharashtra Live News Update: संगमेश्वर माखजन बाजारपेठेला पुन्हा एकदा पुराचा धोका

Ganeshotsav 2025: यंदा गणेशोत्सव कधी आहे? जाणून घ्या तारीख

Khopoli Ghat Traffic : खोपोली घाटात १०० हून अधिक कार थांबल्या, जाणून घ्या धक्कादायक कारण

Mobile Deals: ३००० पेक्षा कमी किंमतीत मोबाईल फोन, YouTube आणि JioHostar पाहण्याची देखील सुविधा

SCROLL FOR NEXT