
बरोबर ५ वर्षांपूर्वी संपूर्ण जगभरात कोरोना नावाच्या व्हायरसने धुमाकूळ घातला होता. या व्हायरसमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला होता. आजही या व्हायरसने घातलेल्या थैमानाला लोकं विसरलेले नाहीत.
अशातच आता अजून एक व्हायरस चीनमध्ये पसरला असल्याची माहिती आहे. सोशल मीडियावर अशा अनेक पोस्ट व्हायरल होतायत ज्यावरून हा व्हायरस कोरोनासारखा गंभीर असू शकतो असं म्हटलं जातंय. या व्हायरसचं नाव HMPV असं आहे.
चीनमध्ये पसरणाऱ्या या व्हायरसचं नाव HMPV असं आहे. यासंदर्भातील मीडिया रिपोर्ट्समध्ये, असा दावा करण्यात आला आहे की, हा व्हायरस मायकोप्लाझ्मा न्यूमोनिया आणि कोविड-19 सारख्या अनेक व्हायरसशी संबंधीत आहे. मुळात ही एक श्वसनाची समस्या असीन यामुळे शरीरात फ्लू सारख्या लक्षणांसह समस्या उद्भवतात.
खोकला येणं
ताप येणं
नाक बंद होणं
घसा खवखवणं
श्वास घेण्यामध्ये अडचण येणं
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, या व्हायरसची लागण कोणाही व्यक्तीला होऊ शकते. मात्र ज्या व्यक्तींची प्रतिकारशक्ती कमकुवर आहे त्यांना या व्हायरसचा संसर्ग होण्याचा धोका जास्त आहे. यामध्ये लहान मुलं, वृद्ध व्यक्ती आणि इतर आजाराने ग्रस्त लोकांचा समावेश आहे. या व्यक्तींनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे.
चीनमध्ये पसरलेल्या या व्हायरसची सध्या जगभरात चर्चा होतेय. हा व्हायरस पूर्वीही नोंदवण्यात आला होता. मात्र आता त्याची प्रकरणं अधिक दिसून येतायत. चिनमधून अनेक रूग्णालयांचे आणि स्मशानभूमीचे व्हिडीओ समोर येतायत. ज्यामुळे या व्हायरसच्या परिस्थितीचं गांभीर्य लक्षात येतं. अहवालांनुसार, 16 ते 22 डिसेंबर दरम्यान श्वसन प्रकरणांमध्ये अचानक वाढ झाली असून यामध्ये 14 वर्षांखालील मुलांचा समावेश आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.