
चीनमध्ये सध्या एका नव्या व्हायरसने थैमान घातलं आहे. ह्युमन मेटाप्युमोव्हायरस (HMPV) याचा अधिक प्रसार दिसून येतोय. इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) च्या तज्ज्ञांनी शनिवारी माहिती दिली की, हा व्हायरस कोविड -19 सारखा प्राणघातक नाही. मात्र या व्हायरसमुळे यामुळे काही व्यक्तींमध्ये फुफ्फुसाचा संसर्ग नक्कीच होऊ शकतो.
चीनमध्ये हा व्हायरस झपाट्याने पसरत असून त्याबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे. IMA च्या केरळ युनिटच्या संशोधन कक्षाचे अध्यक्ष डॉ. राजीव जयदेवन यांनी सांगितलं की, लहान मुलांमध्ये एचएमपीव्ही खूप सामान्य आहे. त्यासाठी कोणतीही लस किंवा अँटीव्हायरल उपचारांची शिफारस केलेली नाही.
डॉ. राजीव म्हणाले की, “एचएमपीव्ही हा धोकादायक किंवा प्राणघातक व्हायरस नाही. हा एक विषाणू नाही ज्यामुळे गंभीर न्यूमोनिया होतो किंवा कोविड साथीच्या आजाराच्या सुरुवातीच्या टप्प्यात मृत्यू होतो. हा व्हायरस लहान मुलांमध्ये इतका सामान्य आहे की जवळजवळ 100 टक्के लहान मुलांना चार किंवा पाच वर्षांच्या वयापर्यंत संसर्ग होतो, असं दिसून आलं आहे.
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, एचएमपीव्ही बहुतेक लोकांमध्ये या व्हायरसची सौम्य लक्षणं दिसून येतात. यामुळे ब्रॉन्कायलाइटिस (फुफ्फुसाचा संसर्ग) आणि काही व्यक्तींमध्ये दम्याचा त्रास होण्याची शक्यता असते. ज्यांना फुफ्फुसाचे आजार आहेत जसं की, क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह लंग डिसीज अशा लोकांवरही या व्हायरसचा परिणाम होऊ शकतो.
HMPV या व्हायरसची पहिल्यांदा 2001 मध्ये नोंद झाली होती. तो श्वसनसंस्थेसंबंधी व्हायरस (RSV) सोबत न्यूमोव्हिरिडेचा एक भाग मानला जातो. यूएस सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (CDC) नुसार, hMPV शी संबंधित लक्षणांमध्ये खोकला, ताप, नाक बंद होणx आणि श्वास घेण्यास त्रास होतो.
चीनमध्ये ह्युमन मेटापन्यूमोव्हायरस (HMPV) च्या अलीकडील उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर, आरोग्य मंत्रालयाने शनिवारी सांगितलं की, भारत या व्हायरसच्या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. त्यामुळे या व्हायरसचा सामना करण्यासाठी भारत पूर्णपणे तयार आहे. आतापर्यंत, श्वसनाच्या आजारांमध्ये कोणतीही असामान्य वाढ झालेली नाही.
त्याचप्रमाणे WHO ला देखील वेळेवर अपडेट्स शेअर करण्याची विनंती करण्यात आलीये . खबरदारीचा उपाय म्हणून, HMPV प्रकरणांची चाचणी करणाऱ्या प्रयोगशाळांची संख्या वाढवली जाणार आहे आणि भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (ICMR) HMPV प्रकरणांचे वर्षभर निरीक्षण करणार असल्याची माहिती आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.