Relationship Tips  Saam TV
लाईफस्टाईल

Relationship Tips : EX च्या कॉन्टॅक्टमध्ये राहणं चांगलं की वाईट; वाचा फायदे आणि नुकसान

Relationship With EX : ब्रेकअपनंतर देखील एक्सबरोबर नातं ठेवणे त्याच्याशी बोलणे योग्य आहे की अयोग्य त्याची माहिती जाणून घेणार आहोत.

Ruchika Jadhav

आयुष्यात बदलत्या वयानुसार आपल्या आयुष्यात नेहमी नवीन व्यक्ती येतात. कामात आणि विविध ठिकाणी आपली नाती तयार होतात. यातील काही नाती खास होतात आणि त्याला प्रेमाचं स्वरुप प्राप्त होतं. जीवनात जगताना पार्टनरबरोबर काही ना काही कारणावरून वाद होतात. त्यामुळे आपण त्या व्यक्तीपासून दूर जातो. ब्रेकअप नंतर आपण दुसऱ्या व्यक्तींच्या संपर्कात येतो आणि त्यांच्या प्रेमात पडतो.

प्रेमाच्या या नात्यात विश्वास फार महत्वाचा असतो. अशात काही कपल समजदारपणे आपलं नातं संपवतात तर काही कपल वाद झाल्याने एकमेकांपासून दूर जातात. अशात काहींना आपल्या जीवनात दुसर्‍या व्यक्तीने प्रवेश केला तरी देखील एक्सशी बोलावं असं वाटतं. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला एक्सशी बोलणे चांगले की वाईट या बद्दल माहिती सांगणार आहोत.

फायदे

जर तुम्ही तुमच्या एक्सच्या कॉन्टॅक्टमध्ये असाल तर त्याने क्लोजरसाठी मदत होते. नातं संपलेलं असताना सु्द्धा काही वेळा मनात अनेक प्र्श्न घर करून असतात. ब्रेकअपनंतरही एक्सशी संवाद साधल्याने आपल्याला या गोष्टींवर पडदा टाकता येतो आणि सर्व वाद मिटवता येतात. ब्रेकअप झालेलं असलं तरी तुम्ही दोघेही एका विचाराने एकमेकांचे मित्र म्हणून राहू शकता. मित्र म्हणून राहिल्याने तुम्हाला छान फिल होईल. काही वेळा एक्सबरोबर कॉन्टॅक्टमध्ये असणं आणखी जास्त महत्वाचं असतं. कारण एक्सच्या आयुष्यात काही अत्यंत कठीण प्रसंग आल्यावर त्यातून सावरण्यासाठी त्यांना तुमची मदत होते.

नुकसान काय होते?

ब्रेकअपनंतरही तुमच्या मनात एक्सबद्दल प्रेम असेल तर हे चूक आहे. कारण यामुळे तुम्हाला पुन्हा एकदा हॉर्ट ब्रेकचा सामना करावा लागू शकतो. तसेच एक्स मुव्ह ऑन करत आहे हे पाहून तुम्हाला याचा आणखी जास्त त्रास सहन करावा लागू शकतो. एक्सबरोबर कॉन्टॅक्ट असल्याने तुम्हाला दुसरी व्यक्ती आवडत असेल तरी देखील तुम्ही आयुष्यात पुढे जाऊ शकत नाही. आपल्या मनात सतत एक्सबद्दल विचार फिरत राहतात. यामुळे सध्याच्या पार्टनमध्ये आणि तुमच्यात देखील वाद होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

GST : छत्र्या, मोबाइल, कपडे ते सायकल, सिमेंट होणार स्वस्त, वाचा केंद्र सरकारचा मास्टरप्लॅन

मेट्रोच्या एका कोचची किंमत किती असते?

Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी थेट दिल्लीत आंदोलन, मराठा क्रांती ठोक मोर्चाचा इशारा

Bitter Melon Juice: दररोज सुदृढ राहायचं आहे? मग रिकाम्या पोटी प्या 'हे' ज्यूस होतील अनेक फायदे

Daily Surya Namaskar effects: दररोज सूर्यनमस्कार केल्याने शरीरात होतात 'हे' बदल

SCROLL FOR NEXT