Relationship Tips : आता बस्स! सहनशक्तीचा अंत झाला? नात्यात 'या' गोष्टी घडल्यास शेवटचा उपया ब्रेकअप

Relationship News : पती-पत्नी किंवा अविवाहीत जोडप्यांमध्ये सतत काही ना काही कारणावरून वाद होतात. काही नात्यात एक वेळ अशी येते जेव्हा व्यक्ती थांबण्याचा निर्णय घेतात.
Relationship News
Relationship TipsSaam TV
Published On

पती-पत्नी किंवा गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंड यांच्यातील नातं एखाद्या खजान्यासारखं असतं. हे नातं इतकं नाजूक असतं की, त्याला घट्ट करण्यासाठी दोन्ही पार्टनर समजदार असले पाहिजे. कपल्समध्ये सुरूवातीचे दिवस फार आनंदात जातात. मात्र नंतर त्यांच्यात वाद वाढतात. वाद वाढल्यास काहीवेळा दोघांकडून देखील एकमेकांचा अपमान होतो. शेवटी हे नातं इतकं बिघडतं की दोघांनाही सुखी राहण्यासाठी एकमेकांपासून वेगळं व्हावं लागतं.

आता तुमचं नातं सुद्धा तुटण्याच्या वाटेवर आहे की नाही याचे काही संकेत आहेत. नात्यात तुम्ही न पटणाऱ्या पुढील गोष्टी घडणे म्हणजे तुमचं नाचं तुटण्याचे संकेत असतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला नातं तुटण्याचे काय संकेत आहेत? याचीच माहिती सांगणार आहोत.

पहिला संकेत

तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत आधीसारखा वेळ घालवत नाही का? या नात्यात काही तरी कमी पडत आहे असं तुम्हालाही वाटतं का? तुम्हाला सुद्धा असं वाटत असेल आणि पार्टनरशी बोलल्यावर त्याला मनातील गोष्टी सांगितल्यावर त्यावर पर्याय निघण्याऐवजी तुमची भांडणे होत असतील तर हे ब्रेकअपचे पहिले लक्षण आहे. असं होत असल्यास समजून जा तुमचं नातं लवकरच संपणार आहे.

Relationship News
Chanakya Niti On Relation : जोडीदार निवडताना चाणक्यांच्या या गोष्टी लक्षात ठेवा, आनंदात जाईल तुमचे वैवाहिक जीवन

दुसरा संकेत

तुम्हाला तुमच्या पार्टनसोबत वेळ घालवण्यापेक्षा कामात व्यस्त राहणे, शांत राहणे, कुणाशीही न बोलणे चांगले वाटत असेल तर हा सुद्धा एक मोठा संकेत आहे. तुम्ही आनंदी नसून देखील पार्टनरला गमवावे लागू नये म्हणून सुखी राहण्याचा प्रयत्न करत असाल तर, असे करून तुम्ही स्वत: तुमची फसवणूक करत असता. तुमची सुद्धा या नात्यात घुसमट होत असेल तर हे नातं संपण्याच्या मार्गावर आहे.

तिसरा संकेत

प्रत्येक व्यक्तीचे वेगवेळे स्वभाव असतात. नात्यात एका वेळानंतर दोघांनी काही संवाद साधला तर त्याच्या शेवटी सतत भांडणे होणे. दोघांनाही एकमेकांची मानसिकता न समजणे हे सुद्धा कमजोर नात्याचे लक्षण आहे. त्यामुळे तुम्ही अशा नात्यातून बाहेर पडण्याचा आताच विचार करू शकता आणि सुखी आयुष्य जगू शकता. नात्यातून बाहेर पडणे हे दोघांसाठी सुद्धा फायदेशीर ठरू शकते.

चौथा संकेत

काहीवेळा तुम्हाला पार्टनरला दुखवायचे नसते तसेच त्याची साथ देखील सोडायची नसते. मात्र पार्टनर सतत तुम्हाला ओरडतो, किंवा दुसऱ्यांनी तुमच्यावर काही अन्याय केला तर त्यावेळी तुमच्या पाठीथी खंबीरपणे उभा राहत नाही. तुमच्याबरोबर सुद्धा असे घडत असेल तर अशा पार्टनचा विचार डोक्यातून काढून टाका. अशा व्यक्ती तुमच्यासाठी घातक आहेत.

Relationship News
After Breakup Move On Tips : ब्रेकअपनंतर तिला किंवा त्याला विसरणं कठीण झालंय? मग 'या' टिप्ससह नव्याने जगायला सुरूवात करा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com