Credit Cards Saam Tv
लाईफस्टाईल

Credit Cards Pros & Cons: एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड असल्यास फायदा होतो की तोटा? जाणून घ्या

Credit Card Advantages and Disadvantages: एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड असल्यास फायदा होतो की तोटा? जाणून घ्या

Satish Kengar

Credit Cards in Banking: सध्या अनेक लोक क्रेडिट कार्ड वापरतात. पेमेंटसाठी क्रेडिट कार्ड वापरण्याचे अनेक फायदे आहेत. यामध्ये तुम्हाला अनेक प्रकारच्या ऑफर, सूट आणि परतफेडीसाठी 50 दिवस व्याजाशिवाय मिळतात. क्रेडिट कार्डच्या मदतीने तुम्ही तुमची बिले सहज भरू शकता आणि ऑनलाइन शॉपिंगही करू शकता. क्रेडिट कार्डचे अनेक फायदे पाहता अनेक लोक एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड घेतात.

मात्र क्रेडिट कार्डचे जितके फायदे आहेत, तितकेच काही तोटेही आहेत. अशा परिस्थितीत तुमच्यासाठी हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे की तुमच्याकडे एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड असावेत की नाही? चला जाणून घेऊया.

क्रेडिट कार्ड कधी घ्याल हवा?

तुम्हाला तुमची आर्थिक व्यवस्था मॅनेज करण्यासाठी क्रेडिट कार्डची आवश्यकता असल्यास, तुम्ही क्रेडिट कार्ड घेऊ शकता. क्रेडिट कार्ड मॅनेज करण्यासाठी तुम्हाला जास्त प्रयत्न करावे लागत नाहीत. तुम्ही त्याचे बिल वेळेवर सहज फेडू शकता. वेळेवर बिले भरून तुम्ही तुमचा क्रेडिट स्कोअर सुधारू शकता. नवीन क्रेडिट कार्ड युजर्ससाठी फक्त एक क्रेडिट कार्ड असणं चांगलं आहे.  (Latest Marathi News)

एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड असण्याचे फायदे

सर्व क्रेडिट कार्डमध्ये वेगवेगळी वैशिष्ट्ये आणि फायदे आहेत. उदाहरणार्थ, काही क्रेडिट कार्ड युजर्सला फक्त प्रवासाशी संबंधित सूट देतात. तर काही क्रेडिट कार्ड केवळ ऑनलाइन खरेदी आणि इंधनावर सूट देतात. अशा परिस्थितीत जर तुम्हाला या सर्व ऑफर्सचा लाभ घ्यायचा असेल, तर तुम्ही एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड ठेवू शकता. पण त्याचे बिल वेळेवर भरा हे लक्षात ठेवा. असं न केल्यास झाल्यास तुमच्या क्रेडिट स्कोअरवर परिणाम होऊ शकतो.

दुसरे क्रेडिट कार्ड कधी घ्यावा?

दुसरे क्रेडिट कार्ड घेण्यापूर्वी तुम्हाला तुमचे रोजचे खर्च आणि लाइफस्टाइल समजून घेणे आवश्यक आहे, ज्यावर तुम्ही जास्त खर्च करता. मग त्यानुसार तुम्ही ब्रँडेड क्रेडिट कार्ड घ्यावे. उदाहरणार्थ, जर तुम्ही फ्लाइटमध्ये खूप प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी एअर माइल्स क्रेडिट कार्ड घेणे अधिक चांगले होईल. दुसरीकडे जर तुम्ही खूप शॉपिंग करत असाल तर तुमच्यासाठी शॉपिंग क्रेडिट कार्ड घेणे चांगले राहील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Garlic Peeling: लसूण सोलण्यासाठी घरच्या घरी वापरता येतील अशा सोप्या पद्धती

Hair Care: केसांचे नुकसान टाळायचंय? मग 'या' गोष्टी आजपासूनच बंद करा

Sun Transit 2025: आजपासून या राशींचं नशीब पालटणार; 12 वर्षांनी सूर्य करणार गुरुच्या नक्षत्रात प्रवेश

Sunday Horoscope : भगवान विठ्ठलाची उपासना लाभदायी ठरेल; ५ राशींच्या लोकांचा दिवस आनंदी जाणार

Maharashtra Politics : राज्याचं राजकीय समीकरण बदललं, 'ठाकरे'च विरोधी पक्षाचा चेहरा? VIDEO

SCROLL FOR NEXT