Car Washing Business Idea: अवघ्या 40 हजारात सुरू होईल 'हा' व्यवसाय, दर महिन्याला मिळेल जबरदस्त कमाई

How To Start Car Washing Business: अवघ्या 40 हजारात सुरू होईल 'हा' व्यवसाय, दर महिन्याला मिळेल जबरदस्त कमाई
Business Idea
Business IdeaSaam TV
Published On

Business Ideas in India : आजकाल अनेक लोक नोकरी करण्यापेक्षा स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याचा विचार करतात. मात्र यात अनेक लोक असेही असतात ज्यांना व्यवसाय सुरु करायचा असतो, मात्र नेमकं काय करावं? हे त्यांना कळत नाही. जर तुम्हालाही हीच अडचण असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.

तुम्हाला व्यवसाय क्षेत्रात प्रवेश करायचा असेल आणि कोणता व्यवसाय सुरू करायचा हे ठरवता येत नसेल, तर तुम्ही कार वॉशिंग सेटअप (Car Washing) करू शकता. कमी भांडवल गुंतवून तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता. यातच काही लोक कार धुण्याच्या व्यवसायाला व्यवसाय मानत नाहीत. पण तसे नाही आहे, कारण हा एक उत्तम आणि फायदेशीर व्यवसाय असल्याचे सिद्ध होऊ शकते. (start a business

Business Idea
Business Idea: सरकारच्या मदतीने सुरु करा व्यवसाय, 50 लाखांपर्यंतचे कर्ज सहज मिळवा

Car washing business : सर्वात महत्वाचं आहे लोकेशन

कार वॉशिंग व्यवसायासाठी लोकेशन ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. दोन गाड्या सहज पार्क करण्यासाठी तुम्हाला रस्त्याच्या कडेला किमान पुरेशी जागा लागेल. कोर वॉशिंगसाठी व्यावसायिक मशीन आवश्यक आहे. त्याची किंमत 12 हजार ते एक लाख रुपयांपर्यंत आहे. जर तुम्हाला लघुउद्योग सुरू करायचा असेल तर तुम्ही कमी किमतीची मशीन घेऊ शकता. मग एकदा तुमचा व्यवसाय सुरू झाला की, तुम्ही महागड्या मशीन खरेदी करू शकता. (Latest Marathi News)

Car washing business : किती पैसे खर्च करावे लागतील?

फक्त 14 हजार रुपये खर्चून तुम्ही दोन हॉर्स पॉवर मशीन खरेदी करू शकता. ही चांगलं काम करेल. यासह तुम्हाला पाईप आणि नोजल मिळेल. याशिवाय तुम्हाला 30 लिटरचा व्हॅक्यूम क्लिनर घ्यावा लागेल, ज्याची किंमत सुमारे 9 ते 10 हजार रुपये असेल. याशिवाय शॅम्पू, हातमोजे, टायर पॉलिश आणि डॅशबोर्ड पॉलिसीचा पाच लिटरचा कॅन यासह धुण्याचे साहित्य घ्यावे लागेल. (UNIQUE IDEA)

Business Idea
Business Idea: नोकरी सांभाळून व्यवसाय करायचाय? १ लाखांच्या भांडवलावर ५० हजार रुपये महिना कमवा

या सर्व गोष्टी एकूण 1500 ते 2000 रुपयांमध्ये येतील. लोकेशन निवडताना लक्षात ठेवा की तुमच्या आउटलेटजवळ जास्त गर्दी नसावी. अन्यथा गाड्या आउटलेटच्या बाहेर पार्क करू शकणार नाहीत. एकूणच हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला 40 ते 50 हजार रुपये खर्च करावे लागतील.

कार धुण्याचे चार्ज किती आहे?

कार धुण्याचे चार्ज शहरानुसार वेगवेगळे असते. साधारणपणे छोट्या शहरांमध्ये १५० ते ५०० रुपये लागतात. तर मोठ्या शहरांमध्ये कार धुण्यासाठी २५० ते ८०० रुपये लागतात. कार धुण्याचे चार्ज वाहनांच्या आकारावर आधारित आहे. स्विफ्ट डिझायर आणि ह्युंदाई वेर्ना सारख्या छोट्या कारसाठी वॉशिंग चार्ज ४०० रुपये आहे. त्याचबरोबर एसयूव्हीसाठी ६०० ते ८०० रुपये आकारले जातात. (Lifestyle News)

जर तुमच्याकडेही दिवसाला 8 ते 10 गाड्या धुण्यासाठी असतील आणि तुम्हाला प्रति कार सरासरी 300 रुपये मिळाले, तर तुम्ही 3000 रुपयांपर्यंत सहज कमाई करू शकता. अशा प्रकारे तुम्ही महिन्याला 80 ते 90 हजार रुपये सहज कमवू शकता.

डिस्क्लेमर : ही बातमी फक्त माहितीसाठी आहे. कोणताही व्यवसाय सुरु करताना, त्याची संपूर्ण माहिती घ्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com