Business Idea news: अनेक नोकरी करणाऱ्यांचं मन नोकरीत लागत नाही. तर अनेकांना नोकरी करून व्यवसाय करायची मोठी इच्छा असते. त्यासाठी अनेक नोकरदार व्यक्ती नोकरी करत असताना वेगवेगळे प्रयोग करत असतात. नोकरी करत व्यवसाय करण्याची इच्छा बाळगणाऱ्यांसाठी चांगली माहिती आहे. तुम्ही १ लाख रुपयांच्या भांडवलाच्या आधारावर तुम्ही सहज ५० हजार रुपये महिना कमवू शकता. (Latest Marathi News)
एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच अनेकांना ऊन्हाच्या झळा बसू लागल्या आहेत. या उन्हाळ्यात बर्फाच्या कारखान्याद्वारे आरामात चांगली कमाई करू शकता. सध्या उन्हाळ्यामुळे बर्फाची मागणी वाढली आहे. शहर किंवा गावात बर्फ लागतोच.
तसेच उन्हाळ्यात अनेक लग्नसोहळे असतात. या कार्यक्रमातही बर्फाची गरज लागते. त्यामुळे शहर किंवा ग्रामीण भागातही बर्फाचा कारखाना सुरू करू शकता. या कारखान्यामुळे तुम्ही चांगली कमाई करू शकता.
सध्याच्या काळात अनेकांनी स्टार्ट्सअप सुरू केले आहेत. बर्फाचा कारखाना सुरू करण्यासाठी जवळील प्रशासकीय कार्यालयात नोंदणी करावी लागणार आहे. बर्फाचा कारखाना सुरू करण्यासाठी फ्रीजरची व्यवस्था करावी लागणार आहे.
फ्रीजर बर्फ तयार करण्यासाठी लागणार आहे. तुम्ही वेगवेगळ्या आकृतीमध्ये बर्फ तयार करू शकता. बर्फाच्या आकृतीने ग्राहकांना आकर्षित करू शकता.
बर्फाचा कारखाना सुरू करण्यासाठी सुरुवातीला भांडवल १ लाख रुपये लागेल. यासाठी तुम्हाला डीप फ्रीजर खरेदी करावा लागेल.
सध्या बाजारात फ्रीजरची किंमत ५०,००० रुपयांपासून सुरू होते. तसेच या इतर उपकरणे देखील खरेदी करावे लागतील. या व्यवसायात (Business) उतरण्याआधी बाजारातील इतर स्पर्धकांच्या व्यवसायाची माहिती घ्यावी. तसेच या व्यवसायाचं संशोधन देखील करू शकता.
या व्यवसायातून सुरुवातीला महिन्याला ३० हजार रुपये कमाई (Income) करू शकता. लग्न सोहळ्यातील कार्यकमासाठी बर्फाच्या ऑर्डर मिळण्यास सुरुवात झाली तर सहज ५० हजार रुपये महिना कमाई करू शकता. बर्फ विकण्यासाठी तुम्हाला कुठे जाण्याची गरज नाही. तुम्ही, बर्फ हा आइस्क्रीमचे दुकान, हॉटेल्स, रेस्टॉरंट इत्यादी ठिकाणी सहज विकू शकता.
तुमच्या व्यवसायाची जाहिरात करून तुमचा व्यवसाय वाढवू शकता. या व्यवसायाने तुमची नक्कीच भरभराट होऊ शकते.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.