Business Idea: सरकारच्या मदतीने सुरु करा व्यवसाय, 50 लाखांपर्यंतचे कर्ज सहज मिळवा

सरकारच्या मदतीने सुरु करा व्यवसाय, 50 लाखांपर्यंतचे कर्ज सहज मिळवा
Business news
Business newsSaam Tv

Business Idea: तुम्हालाही तुमचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर सरकारच्या मदतीने तुम्ही मोठा सेटअप (start a business) उभारू शकता. यासाठी केंद्र सरकार तुम्हाला ५० लाखांपर्यंतचे कर्जही देत ​​आहे.

यातच जर तुम्हाला तुमचा स्वतःचा उद्योग अगदी कमी खर्चात सुरू करायचा असेल, तर केंद्र सरकार तुम्हाला कर्ज घेण्यापासून ते सबसिडीपर्यंतचे फायदे देऊ शकते. आज आम्ही तुम्हाला या योजनेची संपूर्ण माहिती सांगणार आहोत.

वर्ष 2024 पर्यंत भारतीय अर्थव्यवस्थेचा आकार 5 ट्रिलियन डॉलर्सपर्यंत वाढवण्याचा केंद्र सरकार (Central Government) प्रयत्न करत आहे. हे स्वप्न सत्यात उतरवायचे असेल तर लघु आणि मध्यम उद्योगधंदे वाढले पाहिजेत, हे सर्वात महत्त्वाचे आहे. पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम (PMEGP) अंतर्गत लहान उद्योजकांना त्यांचा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रोत्साहित केले जात आहे. (Latest Marathi News)

Business news
Business Idea: नोकरी सांभाळून व्यवसाय करायचाय? १ लाखांच्या भांडवलावर ५० हजार रुपये महिना कमवा

पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम काय आहे? (Prime Minister's Employment Generation Program)

पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम हा क्रेडिट लिंक्ड सबसिडी प्रोग्रामचा एक प्रकार आहे, जो सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयद्वारे (MSME मंत्रालय) संचालित केला जातो. या कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी खादी ग्रामोद्योग आयोग नोडल एजन्सीची (KVIC) नोडल एजन्सी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ही योजना राज्यस्तरावर KVIC, KVIB आणि जिल्हा उद्योग केंद्रामार्फत राबविण्यात येणार आहे.

पीएमईजीपीला 2025-26 पर्यंत मुदतवाढ

सरकारने पीएमईजीपीला 2025-26 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाने (MSME) सांगितले की, ही योजना पाच आर्थिक वर्षांत 40 लाख लोकांसाठी शाश्वत रोजगाराच्या संधी निर्माण करेल.

ही योजना 15 व्या वित्त आयोगाच्या कालावधीसाठी म्हणजेच 2021-22 ते 2025-26 पर्यंत पाच वर्षांसाठी वाढवण्यात आली आहे. पीएमईजीपीचे उद्दिष्ट बिगर कृषी क्षेत्रामध्ये सूक्ष्म उद्योग उभारून देशभरातील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हे आहे.

Business news
Good News: देशाच्या परकीय चलन साठ्यात मोठी वाढ, नऊ महिन्यांचा गाठला उच्चांक

50 लाखांपर्यंत मिळेल कर्ज

या योजनेची मुदत वाढविण्यासोबतच त्यात आणखी काही सुधारणाही करण्यात आल्या आहेत. या अंतर्गत एका उत्पादन युनिटसाठी (Manufacturing Unit) कमाल प्रकल्प खर्च सध्याच्या 25 लाख रुपयांवरून 50 लाख रुपये करण्यात आला आहे. तसेच सेवा युनिटसाठी ते 10 लाख रुपयांवरून 20 लाख रुपये करण्यात आले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com