Adhik Maas Shravani Somvar 2023 Saam Tv
लाईफस्टाईल

Adhik Maas Shravani Somvar 2023: अधिक मासातील पहिल्या श्रावणी सोमवारी जुळून आला शुभ संयोग; जाणून घ्या पूजा विधी व महत्त्व

Adhik Maas Shravani Somvar 2023 Puja : श्रावण महिना हा अधिक पवित्र मानला जातो. या महिन्यात भगवान शंकराची पूजा केली जाते.

कोमल दामुद्रे

Shravani Somvar 2023 : हिंदू पंचागानुसार सध्या अधिक मास सुरु आहे त्यातील आज पहिला श्रावण सोमवार तर उत्तर भारतात आज तीसरा सोमवार आहे. श्रावण महिना हा अधिक पवित्र मानला जातो. या महिन्यात भगवान शंकराची पूजा केली जाते.

अधिक मासातील पहिल्या श्रावणी सोमवारी खास शुभ संयोग जुळून आला आहे. या दिवशी शंकरासोबत विष्णूची पूजा केल्यास अधिक फायदा होणार आहे. र्मिक मान्यतेनुसार श्रावण महिन्यातील सोमवारी उपवास करून शिवलिंगावर जल अर्पण केल्याने साधकाला सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य प्राप्त होते.

1. महिन्याचा पहिला सोमवार खास का असतो?

अधिक मासातील पहिला सोमवार (Somvar) हा 24 जुलै म्हणजेच आज आहे. अधिकमासाच्या पहिल्या सोमवारी भगवान शिवाची पूजा करणे आणि रुद्राभिषेक करणे अत्यंत शुभ मानले जाते. यासोबतच अधिक मासच्या पहिल्या सोमवारी अतिशय विशेष योगही तयार होणार आहेत, ज्यामध्ये रवियोग, शिवयोग आणि सिद्ध योग आहेत.

  • शिवयोग: 23 जुलै रोजी म्हणजेच उद्या दुपारी 02:17 वाजता सुरू होणारा, तो 24 जुलै रोजी म्हणजेच आज दुपारी 02:52 वाजता समाप्त होईल.

  • रवि योग: 24 जुलै म्हणजेच सकाळी 05:38 ते रात्री 10:12 पर्यंत.

2. रुदाभिषेकाचा शुभ मुहूर्त

24 जुलैला म्हणजेच अधिकमासाच्या (Adhik Maas) पहिल्या सोमवारी करणे अत्यंत शुभ मानले जाते. या दिवशी नंदीवर शिववास असतो. आज दुपारी 01:42 वाजता रुद्राभिषेक करता येईल. यानंतर शिववास भोजनात असतो, त्यात रुद्राभिषेक करू नये.

3. अधिक मासच्या पहिल्या सोमवारची पूजा पद्धत

  • सकाळी लवकर उठून आंघोळ करून स्वच्छ कपडे घाला.

  • यानंतर घरातील मंदिरात दिवा लावावा.

  • सर्व देवतांना गंगेच्या पाण्याने (Water) अभिषेक करावा.

  • शिवलिंगाला गंगेचे पाणी आणि दूध अर्पण करा.

  • भगवान शंकराला फुले अर्पण करा.

  • भगवान शिवाला बेलपत्र अर्पण करा.

  • भगवान शंकराची आरती करावी आणि भोगही अर्पण करावेत.

  • देवाला फक्त शुद्ध वस्तू अर्पण केल्या जातात हे लक्षात ठेवा.

  • भगवान शिवाचे अधिकाधिक ध्यान करा.

टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sanjay Raut : हा माणूस महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात कसा राहू शकतो? शिंदेंच्या जय गुजरात घोषणेवर संजय राऊतांची तिखट प्रतिकिया

Ladki Bahin Yojana: लाडकी बहिण योजनेचे वर्षभरात एकूण किती मिळाले पैसे?

Uday Samant : 'मराठी शिकणारच नाही, ही एक मस्ती आहे'; उदय सामंतांची सुशील केडिया यांच्यावर संतापजनक प्रतिक्रिया

Kalyan- Shilphata Road: कल्याण-डोंबिवलीकरांची ट्रॅफिकमधून सुटका, पलावा पूल आजपासून सुरू

Sushil Kedia Controversy : मराठी शिकणार नाही म्हणणारे सुशील केडिया घाबरले; पोलिसांकडे केली सुरक्षेची मागणी

SCROLL FOR NEXT