Astro Tips SAAM TV
लाईफस्टाईल

Astro Tips : राशीनुसार खिशात ठेवा 'या' रंगाचा रुमाल, आयुष्यात होईल पैशांची भरभराट

Money Attraction Tips : पैशांची चणचण कमी करायची असल्यास आपल्या राशीनुसार खिशात 'या' रंगांचे रुमाल ठेवणे शुभ मानले जाते.

Shreya Maskar

ज्योतिषशास्त्रात पैशाला आकर्षित करण्याचे अनेक उपाय सांगितले आहेत. आयुष्यात पैशांची कमतरता भासत असल्यास नियमित आपल्या कपड्यांच्या खिशात राशीनुसार विविध रंगाचे रुमाल ठेवावे. ग्रह-नक्षत्रामुळे करिअरमध्ये प्रगती होऊन घरा पैसा येतो. आयुष्यात खूप यश मिळवायचे असल्यास या छोट्या गोष्टी खूप महत्वाच्या ठरतात.

१२ राशींसाठी वेगवेगळ्या रंगांचे रुमाल

मेष

मेष राशीच्या लोकांनी लाल, गुलाबी रंगाचा रुमाल खिशात ठेवा. यामुळे घरात धनदौलत टिकून राहते.

वृषभ

वृषभ राशीच्या लोकांनी हलक्या निळा रंगाचा रुमाल खिशात ठेवा. यामुळे कामात त्यांची प्रगती होते.

मिथुन

मिथुन राशीच्या लोकांचे एखादे काम रखडले असेल. तर त्या कामाला जाताना खिशात हिरवा, केशरी, गुलाबी यांपैकी कोणत्याही एका रंगाचा रुमाल ठेवावा.

कर्क

कर्क राशीच्या लोकांनी नियमित पांढरा, पिवळ्या रंगाचा रुमाल सोबत ठेवा. यामुळे करिअरमध्ये तुमची प्रगती होईल.

सिंह

सिंह राशीच्या लोकांनसाठी पिवळा, गुलाबी, लाल, केशरी हे रंग शुभ मानले जातात. यामुळे या रंगांचे रुमाल खिशात ठेवा.

कन्या

कन्या राशीच्या लोकांनी राखाडी, केशरी रंगाचा रुमाल ठेवल्यास त्यांना पैशांची कमतरता भासत नाही.

तूळ

तूळ राशीच्या लोकांनी आपल्या सोबत नेहमी पांढरा, निळ्या रंगाचे रुमाल ठेवावा. यामुळे रखडलेले पैशांचे व्यवहार मार्गी लागतात.

वृश्चिक

वृश्चिक राशीच्या लोकांनसाठी गुलाबी रंग शुभ मानला जातो. यामुळे पैशांसोबत आरोग्य देखील उत्तम राहते.

धनु

धनु राशीच्या लोकांसाठी पिवळा, केशरी आणि क्रीम रंग शुभ आहे. यामुळे त्यांना धनलाभ होऊ शकतो.

मकर

मकर राशीच्या लोकांनी आकाशी, जांभळा रंगाचा रुमाल खिशात ठेवावा. यामुळे तुमच्या डोक्यावरचे कर्ज लवकर कमी होईल.

कुंभ

कोणाकडून पैसे येणे बाकी असेल तर, कायम निळ्या रंगाचा रुमाल सोबत ठेवावा.

मीन

तुमच्या खिशात पैसे टिकत नसती तर, केशरी, पिवळा आणि क्रीम रंगाचा रुमाल खिशात ठेवा.

डिस्क्लेमर : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : - पहिल्या वर्षापासून हिंदी सक्तीला नागपूरातील तज्ज्ञांचा विरोध

Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांची अलिबागमध्ये मोठी गुंतवणूक; खरेदी केले 3 प्लॉट, किंमत वाचून पायाखालची जमीन सरकेल

Sangola Bandh : भाजपच्या रॅलीत आमदाराच्या घरावर हल्ला, सोलापूरचे राजकारण तापलं, सांगोला बंदची हाक

Babasaheb Patil: 'शेतकऱ्यांना कर्जमाफीचा नाद लागला'; सहकार मंत्र्यांनी जखमेवर मीठ चोळलं

Third and Fourth Mumbai : तिसरी आणि चौथी मुंबई नेमकी कोणती आणि कशी, कुठपर्यंत असणार?

SCROLL FOR NEXT