माजी काँग्रेस अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी छ्त्तीसगड दौऱ्यावर आहेत. आपल्या दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी राहुल गांधीनी थेट शेताचा रस्ता पकडत भात कापणी केली. यावेळी राहुल गांधींचं वेगळं रुप पाहायला मिळालं. राहुल गांधींनी डोक्याला रुमाल बांधला होता. हाती विळा घेऊन त्यांनी शेतकऱ्यांसोबत भात कापणी केली. (Latest News)
राहुल गांधी आपल्या दौऱ्यात काठिया गावातील शेतात गेले होते. स्वत: राहुल गांधी आल्याचं पाहून शेतकरी आवाक झाले. यावेळी राहुल गांधींनी डोक्याला रुमाल बांधून हातात विळा घेऊ भाताची कापणी केली. यादरम्यान त्यांनी भात कापणाऱ्या शेतकऱ्यांशी चर्चा केली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
शेतात जाऊन भात कापणीचे फोटो राहुल गांधींनी सोशल मीडियाच्या फ्लॅटफॉर्मवरच्या एक्सवर पोस्ट केले आहेत. फोटो पोस्ट करताना राहुल गांधींनी छत्तीसगड सरकारने केलेल्या कामाची माहिती दिलीय. शेतकरी खूश आहे तर भारत खूश आहे. छत्तीसगडमधील शेतकऱ्यांसाठी काँग्रेस सरकारने खूप चांगलं काम केलंय. छत्तीसगडच्या काँग्रेस सरकारने केलेल्या कामांमुळे येथील शेतकऱ्यांना आनंदी केलंय. हाच पॅटर्न आम्ही संपूर्ण देशात राबवू असं राहुल गांधींनी लिहिलंय.
कठिया गावाचे शेतकरी पीलूराम साहू यांच्या शेतात राहुल गांधी यांनी भात कापणी केली. यावेळी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री भूपेश बघेल, उपमुख्यमंत्री टीएस सिंहदेव, गृहमंत्री ताम्रध्वज साहू, विधाससभा अध्यक्ष चरणदास महंत उपस्थित होते. यावेळी राहुल गांधींनी केलेला पेहराव अनेकांना भावला आहे. सोशल मीडियावर त्याचे फोटो खूप व्हायरल झाले आहेत.
दरम्यान खासदार राहुल गांधी यांनी दोन दिवशीय छत्तीसगडच्या दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी कवर्धा येथे निवडणूक सभा घेतली. छत्तीसगडमध्ये निवडणूक होणार आहेत. यामुळे मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी विविध गोष्टी उमेदवारांकडून केल्या जातात. यात राहुल गांधीदेखील कमी नाहीत. त्यांनीही मतदारांना आकर्षित करण्यासाठी हा पेहराव घेतलाय.
याआधी राहुल गांधींनी बिलासपूर ते रायपूरपर्यंत ट्रेनने प्रवास केला होता. या प्रवासादरम्यान त्यांनी सर्वसामान्य प्रवाशांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या होत्या.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.