Sonakshi Sinha Wedding Look : सोनाक्षी आज होणार जहीरची बायको, लग्नात परिधान करणार 'या' रंगाचा लेहेंगा; पाहा VIDEO

Sonakshi- Zaheer Wedding Latest Update : सोशल मीडियावर सोनाक्षी कोणता लूक कॅरी करणार याची जोरदार चर्चा सुरू आहे. लेहेंग्याचे फोटोही सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
Sonakshi Sinha Wedding Look : सोनाक्षी आज होणार जहीरची बायको, लग्नात परिधान करणार 'या' रंगाचा लेहेंगा; पाहा VIDEO
Sonakshi Sinha Wedding LookSaam Tv

बॉलिवूडची ‘दबंग’ स्टार अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आज लग्नबंधनात अडकणार आहे. आज सोनाक्षी सिन्हा बॉयफ्रेंड झहीर इक्बालसोबत रजिस्टर मॅरेज करणार आहे. सोनाक्षी आणि झहीर यांना इंडस्ट्रीतल्या अनेक सेलिब्रिटींनी पुढच्या आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. सोनाक्षी आणि जहीर गेल्या तीन वर्षांपासून एकमेकांना डेट करीत आहेत. हे आज रजिस्टर मॅरेज करणार असून संध्याकाळी संपूर्ण बॉलिवूड इंडस्ट्रीसाठी रिसेप्शन पार्टी ठेवणार आहेत. अशातच सोशल मीडियावर सोनाक्षी कोणता लूक कॅरी करणार याची जोरदार चर्चा सुरू आहे.

Sonakshi Sinha Wedding Look : सोनाक्षी आज होणार जहीरची बायको, लग्नात परिधान करणार 'या' रंगाचा लेहेंगा; पाहा VIDEO
Shreya Bugade Post : 'मला मुलगी झाली तर...', इंडस्ट्रीत २७ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने श्रेया बुगडेने केली खास पोस्ट

सोनाक्षी-झहीर लग्नामध्ये कोणते आऊटफिट्स करणार, याची जोरदार चर्चा सुरु आहे. सेलिब्रिटी फोटोग्राफरने याबद्दलचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. लग्नाच्या आदल्या दिवशी सोनाक्षीच्या 'रामायण' बंगल्याच्या बाहेरुन कारमधून लग्नाचे कपडे येताना स्पॉट झाले आहेत. रिसेप्शनसाठी सोनाक्षी पिच कलरचा घागरा वेअर करणार आहे. ओढणी आणि घागरा वेअर करणार असल्याचे कळत आहे. यावेळी आणखी काही आऊटफिट्सही पाहायला मिळत आहे.

विरल भयानीने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये, सोनाक्षी सिन्हा आई आणि वडिलांसोबत मिळून लग्नाच्या अगोदर पूजा करताना दिसली.. सध्या हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर तुफान व्हायरल होत आहे. सोनाक्षी आणि झहीर यांच्या लग्नाबद्दल कोणतीही अपडेट समोर आलेली नाही. लग्नानंतर सोनाक्षी-जहीर, या जोडप्याचा पहिला फोटो, पहिली झलक पाहण्यासाठी सर्वच आतुर आहेत. वडील शत्रुघ्न सिन्हा यांनी लग्नाला जाणार नाही, असं सांगितलं होतं. पण आता रजिस्टर मॅरेजसाठी सोनाक्षीचे आई- वडील पण उपस्थिती लावणार का ? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Sonakshi Sinha Wedding Look : सोनाक्षी आज होणार जहीरची बायको, लग्नात परिधान करणार 'या' रंगाचा लेहेंगा; पाहा VIDEO
Anushka Shetty Laughing Disease : देवसेनाला झालाय हसण्याचा दुर्मिळ आजार, मध्येच रडता रडता हसतेय; कोणता आहे नेमका आजार

मुंबईतील दादर येथील बॅस्टियन रेस्टॉरंटमध्ये सोनाक्षी-जहीरच्या लग्नाची रिसेप्शन पार्टी होणार आहे. शिल्पा शेट्टीच्या हॉटेलमध्ये हा कार्यक्रम होणार आहे. लग्नासाठी हेमा कुरेशी, हनी सिंग, सलमान खान, हिरामंडी वेबसीरीजची स्टारकास्ट रिसेप्शनला उपस्थिती लावण्याची शक्यता आहे. या रिसेप्शन पार्टीमध्ये बॉलिवूडमधील आणखी कोणकोणते सेलिब्रिटी उपस्थिती लावणार हे पाहणं औत्सुतक्याचं ठरणार आहे.

Sonakshi Sinha Wedding Look : सोनाक्षी आज होणार जहीरची बायको, लग्नात परिधान करणार 'या' रंगाचा लेहेंगा; पाहा VIDEO
Theft At Anupam Kher Office : अनुपम खेर यांच्या कार्यालयात चोरी करणारा अखेर सापडला, पोलिसांनी आरोपीला ४८ तासांतच शोधून काढलं

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com