अभिनेत्री श्रेया बुगडे हिने आपल्या कॉमेडीच्या मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये स्वत:ची जागा प्रस्थापित केली आहे. श्रेया बुगडे हिला महाराष्ट्रातल्या घराघरांत 'चला हवा येऊ द्या' या कॉमेडी शोच्या माध्यमातून प्रसिद्धी मिळवली आहे. आता यानंतर ती लवकरच ‘ड्रामा Juniors’ या नव्या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेत्रीने या शोचं निमित्त साधत इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने तिची बालपणाची आठवण सांगितली आहे.
शेअर केलेल्या पोस्टमध्ये श्रेयाने लिहिलंय की, "खरंतर २७ वर्षांपूर्वी मी बालकलाकार म्हणून या मनोरंजन क्षेत्रात आले आणि इथेच रमले. साधारण २१ वर्षांपूर्वी ‘तुझ्याविना’ या मालिकेच्या निमित्ताने मी ‘झी’ परिवारात सामील झाले आणि टीव्हीचा उंबरठा ओलांडून तुमच्या घरात आले. तेव्हापासूनच आपलं एक वेगळं नातं आहे. नातं आपुलकीचं, प्रेमाचं आणि जबाबदारीचं... होय जबाबदारीचं सुद्धा... कारण सांगते! "
कारण सांगताना श्रेयाने लिहिलंय की, "एकदा प्रेक्षकांमध्ये बसलेल्या एक काकू सहज बोलता-बोलता म्हणाल्या “मला जर मुलगी झालीना तर तिचं नाव मी ‘श्रेयाच’ ठेवेन. तुझ्यासारखीच होऊदे पोर माझी मला एवढं ‘धस्स’ झालं होतं त्या दिवशी, बापरे! पुढे, त्या काकूंना ‘श्रेया’ झाली की ‘श्रेयस’ ते काही मला कळलं नाही. पण, माझी मात्र जबाबदारी वाढली कारण अशाच काही काकू, काका, दादा, ताईंची चिमुरडी घेऊन पुन्हा एकदा टीव्हीचा उंबरठा ओलांडून मी तुमच्या घरी येतेय !! आजपासून सुरु होणाऱ्या ‘ड्रामा ज्युनिअर्स’ या शोचं सूत्रसंचालन मी करणार आहे. पुन्हा एक नवीन प्रवास सुरु करणार आहे."
पोस्टमध्ये पुढे श्रेयाने लिहिलंय की, "झी मराठी आणि मी आमच्या या जोडीला तुम्ही कायम खूप प्रेम आणि यश दिलंत, या नवीन प्रवासात आमच्याबरोबर जोडलेल्या सगळ्यांना पण तसंच भरभरून प्रेम द्याल याची खात्री आहे. आम्ही येतोय आमच्या गँगबरोबर… भेटू मग शनिवार आणि रविवार रात्री ९-१० वाजता"
आतापर्यंत अभिनेत्री आणि कॉमेडी क्वीन म्हणून चाहत्यांच्या भेटीला आलेली श्रेया प्रेक्षकांना नव्या भुमिकेत दिसणार आहे. ‘ड्रामा Juniors’ या कार्यक्रमासाठी श्रेया सुत्रसंचालन करणार आहे. तर या कार्यक्रमामध्ये परिक्षकाची जबाबदारी संकर्षण कऱ्हाडे आणि अमृता खानविलकर सांभाळणार आहे. हा कार्यक्रम प्रेक्षकांना ‘झी मराठी’ वाहिनीवर शनिवार आणि रविवारी रात्री ९ वाजता पाहता येईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.