Aadhaar Card on WhatsApp saam tv
लाईफस्टाईल

Aadhaar Card on WhatsApp: आता व्हॉट्सअ‍ॅपवरही मिळणार आधार कार्ड, झटपट डाउनलोड करण्याच्या सोप्या स्टेप्स

Aadhaar Card WhatsApp Download: MyGov Helpdesk चॅटबॉटच्या माध्यमातून आता व्हॉट्सअ‍ॅपवर थेट आधार कार्ड PDF डाउनलोड करता येणार आहे. UIDAIने सुरू केलेली ही सेवा पूर्णपणे सुरक्षित आहे.

Sakshi Sunil Jadhav

आधार कार्ड हे भारतीय नागरिकांचा महत्त्वाचा पुरावा किंवा ओळखपत्र आहे. आता ते मिळवणं आणखी सोपं झालं आहे. भारत सरकारने नागरिकांसाठी एक नवी डिजिटल सुविधा सुरू केली आहे. त्यामध्ये तुम्हाला व्हॉट्सअ‍ॅपवर आधार कार्ड डाउनलोड करता येणार आहे. त्यामुळे आधार मिळवण्यासाठी UIDAIची वेबसाइट किंवा DigiLocker अ‍ॅप उघडण्याची गरज उरणार नाही. पुढील बातमीत आपण याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणाप आहोत.

आधारसाठी आवश्यक गोष्टी कोणत्या?

आधारची ही सुविधा अधिकृत MyGov Helpdesk चॅटबॉटच्या माध्यमातून उपलब्ध करण्यात आली आहे. देशभरात व्हॉट्सअ‍ॅपचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. त्यामुळे या नव्या सुविधेमुळे लाखो नागरिकांना मोठा फायदा होणार आहे. रोजच्या कामांमध्ये व्हॉट्सअ‍ॅप वापरणाऱ्या नागरिकांसाठी ही सेवा खूप फायदेशीर ठरणार आहे. याचा लाभ घेण्यासाठी आधारशी लिंक असलेला मोबाइल नंबर असणं आवश्यक आहे. तसेच अॅक्टीव्ह DigiLocker अकाउंट असणंही गरजेचं आहे.

सुविधेचा लाभ कसा घ्यायचा?

MyGov Helpdeskचा अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप नंबर मोबाइलमध्ये सेव केल्यानंतर तुम्हाला याचा फायदा मिळायला सुरुवात होते. व्हॉट्सअ‍ॅपवर Hi किंवा नमस्कार असा मेसेज पाठवल्यानंतर चॅटबॉटद्वारे DigiLocker सेवा निवडता येते. त्यानंतर आधार क्रमांक टाकून OTP टाका. तिथे तुमचे नाव शोधल्यावर तुम्हाला तुमच्या कागदपत्रांची यादी दिसेल. यामधून आधार हा पर्याय निवडा. मग PDF आधार कार्ड थेट व्हॉट्सअ‍ॅपवर मिळतं.

महत्वाच्या अटी कोणत्या?

ही सेवा वापरताना आधार DigiLockerशी लिंक असणं आवश्यक आहे. जर लिंक नसेल, तर DigiLocker अ‍ॅप किंवा वेबसाइटवरून ते अपडेट करता येते. एकावेळी केवळ एकच कागदपत्रे डाउनलोड करता येतात. मात्र सरकारकडून ही सेवा पूर्णपणे सुरक्षित असल्याचं सांगण्यात आलं आहे. नागरिकांच्या वैयक्तिक माहितीच्या सुरक्षेची योग्य काळजी घेतली जाते. तर याचा लाभ सगळ्या भारतीयांनी घेतला पाहिजे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Navi Mumbai Places: ऐतिहासिक किल्ला ते मॉडर्न मॉल; नवी मुंबईतील 5 प्रसिद्ध ठिकाणे

BJP - Shinde Sena : महापालिका निवडणूक निकालानंतर मोठी घडामोड; भाजप-शिंदेसेना युती तुटण्याची शक्यता

Mahayuti: छत्रपती संभाजीनगरात भाजप-शिंदेसेना आमनेसामने; पराभवावरून आमदारानं डिवचलं

Vetoba temple Konkan: भक्तांच्या हाकेला धावणारा देव वेतोबा; कोकणात कुठे आहे याचं मंदिर?

Crime News: बेडरूममध्ये पत्नीचे दोन परपुरुषांसोबत भलतेच चाळे सुरू, तेवढ्यात पती आला अन्...; जे घडलं त्यानं गाव हादरलं

SCROLL FOR NEXT