Siddhi Hande
करंजी तर सर्वांनाच आवडते. परंतु तुम्ही कधी पाकातील करंजी खाल्लीये का?
पाकातील करंजी ही खूप मस्त लागते. एकतारी पाक वापरुन तुम्ही ही खुसखुशीत करंजी बनवू शकतात.
खवा, रवा, पिठीसाखर, काजू, बदाम पिस्ता, वेलची पावडर, मैदा, तुपाचे मोहन, कोमट पाणी
सर्वात आधी तुम्हाला पीठ मळून घ्यायचे आहे. यासाठी मैद्यात तूपाचे मोहन टाका. हे पीठ गरम पाणी टाकून मळून घ्या. अर्धा तास बाजूला ठेवा.
सारणात तुम्हाला कोरडा खवा घ्यायचा आहे. त्यात भाजलेला रवा टाका. यामध्ये ड्रायफ्रुट्स टाका. वरुन वेलची पावडर मिक्स करा.
यानंतर पीठाच्या बारीक पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत. त्याच्या कडा लाटून घ्या.
यानंतर एका बाजूला तेलात करंज्या तळून घ्या.
दुसऱ्या बाजूला पाक बनवण्यासाठी एक कप साखर आणि एक कप पाणी ठेवा. एकतारी पाक होऊ द्या.
पाक थंड झाल्यावर त्यात गरम करंज्या बुडवून घ्या. १-२ मिनिटे करंज्या बुडवून लगेच बाहेर काढा.