BP Natural Control: रोज रात्री झोपताना या 3 पेयांचं करा सेवन, हाय BPचा त्रास होईल कमी

Heart Health: झोपण्याआधी बीटा ज्यूस, कॅमोमाईल चहा आणि लो-फॅट दूध घेतल्याने उच्च रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होऊ शकते. मात्र डॉक्टरांचा सल्ला आवश्यक आहे.
Heart Health
BP Natural Controlsaam tv
Published On

सध्या धकाधकीच्या जीवनात अनेकांच्या खाण्यापिण्याच्या वेळेत बदल होताना पाहायला मिळतो. त्यामध्ये सध्या लोक दिवस रात्र मेहनत करतात. लोक ऑफीसमध्ये तांसतास बसतात. त्यामुळे शरीराची कमी हालचाल होते. खाल्लेले अन्नही वेळेवर पचत नाही. शरीरात यासगळ्या मुळे गोंधळ उडतो. त्याने भविष्यात जीवघेण्या समस्यांना सामोरं जावं लागतं. त्यातच हाय ब्लड प्रेशर ही समस्या सगळ्यात जास्त प्रमाणात आढळत आहे. याच्या लक्षणांकडे किंवा होणाऱ्या त्रासाकडे दुर्लक्ष केल्याने थेट हार्ट अटॅकसारख्या जीवघेण्या सामोरे जावे लागते.

ज्या व्यक्तींना बीपीचा त्रास आहे. त्यांनी त्यांच्या आहारात वेळोवेळी पत्थ्य पाळणं गरजेचं आहे. तसेच रोज सकाळी उठल्यावर रक्तदाब तपासणे सुद्धा महत्वाचे आहे. कारण या आजारावर फक्त गोळ्या औषधंच नाही तर काही घरगुती उपायही फायदेशीर ठरतात. विशेषतः झोपण्याआधी काही पेये रोज सेवन केल्याने शरीराला आराम मिळतो आणि सकाळी रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते. मात्र हा उपाय औषधांचा पर्याय नाही.

Heart Health
Bandhani Dress: बांधणीच्या ड्रेसच्या 'या' आहेत हटके डिझाइन्स, दिसाल सिंपल अन् आकर्षित

बीटा ज्यूस हा रक्तदाब कमी करण्यासाठी फायदेशीर मानला जातो. बीटामध्ये नैसर्गिक नायट्रेट्स असतात, जे शरीरात नायट्रिक ऑक्साइडमध्ये रूपांतरित होतात. नायट्रिक ऑक्साइडमुळे रक्तवाहिन्या सैल होतात, रक्ताभिसरण सुधारतं आणि धमन्यांवरचा दाब कमी होतो. पण किडनीच्या (Kidney)समस्या असलेल्या याचं सेवन मर्यादित प्रमाणात करावं.

कॅमोमाईल चहा हा शरीराला शांत करणारा आणि मनाला आराम देणारा मानला जातो. जो डेझीसारख्या दिसणाऱ्या कॅमोमाईल फुलांपासून बनवलेला कॅफीन-मुक्त चहा आहे. तणाव हे उच्च रक्तदाब वाढण्यामागचं एक मोठं कारण असतं. कॅमोमाईल चहा प्यायल्याने मन शांत होतं, झोपेची गुणवत्ता सुधारते आणि त्यामुळे रक्तदाबावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो. संशोधनातून असं दिसून आलं आहे की कॅमोमाईल चहा घेतल्याने LDL कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराइड्सची पातळी कमी होण्यास मदत होते.

दुधाचं सेवन सुद्धा रक्तदाब नियंत्रणासाठी फायदेशीर ठरू शकतं. लो-फॅट किंवा स्किम दूध प्यायल्याने हृदयाचं कार्य सुधारतं. अनेक संशोधनांमध्ये असं आढळून आलं आहे की रोज दूध पिणाऱ्या लोकांचा सिस्टोलिक रक्तदाब, दूध न पिणाऱ्यांच्या तुलनेत सुमारे 10 mmHg पर्यंत कमी असू शकतो.

टीप: हा लेख केवळ माहितीच्या उद्देशाने असून वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय नाही. कोणताही उपाय सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.

Heart Health
Success Story: फुटपाथवर आईने कष्ट केले, पोरानं आज वर्दी चढवली! नोकरी लागताच गोपाळ आईपुढे नतमस्तक; काळजाला भिडणारा व्हिडिओ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com