आपल्या जगभरात अशा अनेक जागा आहेत, ज्यांच्यामध्ये रहस्य दडलेलं आहे. तर काही जागा इतक्या भयानक आहेत की, त्यांचं रहस्य अजून उलगडू शकलेलं नाही. आज आम्ही तुम्हाला अशाच एका जागेबद्दल माहिती देणार आहोत. ही जागा प्रशांत महासागराने वेढलेली असून प्वाइंट निमो (Point Nemo) असं याचं नाव आहे. या जागेबाबत ऐकून संशोधक देखील हैराण झाल्याची माहिती आहे.
असं म्हटलं जातं, या जागेच्या चारही बाजूला शुकशुकाट आहे. या जागेचा शोध हर्वोज लुकातेला या इंडिनियरने १९९२ मध्ये लावला होता. या जागेवर कोणीही मनुष्य किंवा झाडं झुडुपं नसल्याची माहिती आहे. असं म्हटलं जातं की, अंतराळात खराब झालेले उपग्रह सोडण्यासाठी या जागेचा वापर केला जातो.
असा दावा केला जातो की, समुद्राच्या मधोमध हा पॉईंट निमो आहे. ही जागा दक्षिण अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्या मध्ये आहे. परंतु या देशावर कोणाचाही अधिकार नाहीये. वैज्ञानिकांच्या सांगण्यानुसार, १९९७ साली प्वाईंट निमोवर एक असा रहस्यमयी आवाज आला होता. जवळपास दोन हजार किमी दूर हा आवाज ऐकू आला होता. दरम्यान अजूनही हा आवाज कशाचा आहे, याचा उलगडा झालेला नाही.
काही लोकांच्या मानण्यानुसार, हा आलेला रहस्यमयी आवाज दुसऱ्या जगाचा होता. या रहस्यमयी आवाजाचे अनेक सिद्धांतही तयार केले. ज्या लोकांना हा रहस्यमयी आवाज ऐकला होता त्यांच्या मनात भीती निर्माण झाली होती. अनेक शास्त्रज्ञांनी या ठिकाणी जाण्यास नकार दिला. मात्र एका वैज्ञानिक या ठिकाणी गेला होता. त्याच्या म्हणण्यांनुसार, या ठिकाणी अनेक मोठे खडक असून हा कदाचित या खडकांच्या तुटण्याचा आवाज आहे.
डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.