Mysterious story: भारतातील ही भयानक विहीर तुम्हाला माहितीये का? जर यामध्ये प्रतिबिंब दिसलं नाही तर...!

Mysterious story: भारतात अशी काही रहस्य आहेत, ज्यांचा उलगडा करणं शास्त्रज्ञांनाही जमलं नाही. उत्तर प्रदेशात असलेल्या अशा रहस्यमयी विहीरीबद्दल तुम्हाला माहितीये का?
mystery well
mystery wellsaam tv
Published On

जगभरात अशी अनेक रहस्य आहेत, ज्यांचा उलगडा अजून होऊ शकलेला नाही. दरम्यान भारतात देखील अशी काही रहस्य आहेत, ज्यांचा उलगडा करण्यासाठी शास्त्रज्ञांनी देखील हात टेकले आहेत. उत्तर प्रदेशातील काही भागांमध्ये अशा काही गोष्टी आहेत, ज्यामध्ये अनेक रहस्य असल्याचं म्हटलं जातं.

या शहरामध्ये धर्मराज यमराजशी जोडल्या गेलेल्या अनेक कहाण्या असल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे. या ठिकाणी एक मंदिर आहे आणि त्या मंदिराजवळ एक रहस्यमयी विहीर आहे. असं मानलं जातं की, ही विहीर भक्तांना त्यांच्या मृत्यूसंदर्भात संकेत देते.

यमराजने बनवली होती विहीर

हे मंदिर मीरघाटवर असून याचं नाव धर्मेश्वर महादेव मंदिर असं आहे. या ठिकाणी एक धर्मकूपही आहे. रिपोर्ट्सनुसार, मंदिराच्या पुजाऱ्यांचं असं म्हणणं आहे की, या कूपाचा इतिहास गंगा धरतीवर येण्यापूर्वीचा आहे. याला सूर्यपुत्र यमाने बनवलं असून त्याने या ठिकाणी तपस्या केली होती.

mystery well
Haunted Park: स्मशानाच्या बाजूला बनवलंय 'हे' खेळण्याचं पार्क; रात्री अशा रहस्यमयी घटना घडतात की...!

जर विहीरीत प्रतिबिंब दिसली नाही तर...

या रहस्यमयी विहीरीबाबत अशी मान्यता आहे की, ही विहीर मृत्यूचे संकेत देते. असं मानलं जातं की, जर या विहिरीत पाहिलं आणि त्याची प्रतिबिंब दिसली नाही तर पुढच्या ६ महिन्यांमध्ये त्या व्यक्तीचा मृत्यू होतो. या पुरातन मंदिराबाबत अशी धारणा आहे की, याठिकाणी शिव आणि यमराज देव एकत्र राहतात.

स्थानिकांच्या म्हणण्यांनुसार, धर्मेश्वर महादेव प्राचीन मंदिरात बांधलेली ही विहीर यमराजानेच बांधली होती. दरम्यान व्यक्तीच्या मृत्यूबाबत याठिकाणी कोणताही पुरावा सापडला नाही.

यमराजाने भगवान शिव यांना केलं होतं प्रसन्न

यमराजाने भगवान शिव यांना प्रसन्न करण्यासाठी याठिकाणी तपश्चर्या केली होती. परंतु यमराजांना भगवान शंकरांना प्रसन्न करण्यात यश येत नव्हतं. यावर भगवान विष्णूंनी यमराजांना एक विहीर बांधण्याचा सल्ला करून तपस्या करण्यास सांगितली. यानंतर शिव प्रसन्न झाले.

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही.

mystery well
Mysterious Train: 100 हून जास्त प्रवाशांसह बोगद्यात शिरलेली ट्रेन अचानक झाली गायब; काय आहे या रहस्यमयी ट्रेनचं सत्य?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com