Noida Boy Discovers Asteroid saam tv
लाईफस्टाईल

Daksh Malik: अवघ्या १४ वर्षांच्या संशोधकाने अंतराळात शोधला नवीन लघुग्रह; NASA कडून मोठी दखल

Noida Boy Discovers Asteroid: या शोधानंतर त्यांना त्या लघुग्रहाचं नाव ठेवण्याचा विशेष अधिकार मिळणार आहे. सध्या या लघुग्रहाचे तात्पुरते नाव 2023 OG40 ठेवण्यात आलं आहे.

Surabhi Jayashree Jagdish

नोएडाच्या एका मुलांने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. नोएडातील शिव नादर शाळेत जाणाऱ्या दक्षव मलिक या मुलाने ही कामगिरी केली आहे. दक्षला लघुग्रहाच्या शोधासाठी नासाकडून त्यांना प्रतिष्ठेचा सन्मान मिळाला आहे. या शोधानंतर त्यांना त्या लघुग्रहाचं नाव ठेवण्याचा विशेष अधिकार मिळणार आहे. सध्या या लघुग्रहाचे तात्पुरते नाव 2023 OG40 ठेवण्यात आलं आहे.

दक्षला अंतराळ गोष्टींची प्रचंड आवड

दक्ष मलिकला अंतराळातील गोष्टींची फार पूर्वीपासून आवड आहे. नॅशनल जिओग्राफिकच्या डॉक्टुमेंट्री पाहून त्याला अवकाशाबद्दल अधिक जाणून घेण्याची प्रेरणा मिळाली. दक्ष म्हणाला, "मी लहान असताना नॅशनल जिओग्राफिकवर ग्रह आणि सूर्यमालेविषयी डॉक्युमेंट्री पाहिली होती. यामुळे मला अंतराळात रस निर्माण झाला आणि हाच मार्ग मी स्वीकारला पाहिजे, असं मला वाटलं."

१८ महिने केलं शोध कार्य

दक्ष मलिक आणि त्याच्या दोन मित्रांनी 18 महिने आंतरराष्ट्रीय लघुग्रह संशोधन प्रकल्पावर एकत्रित काम केलं. हे प्रोजेक्ट "आंतरराष्ट्रीय लघुग्रह शोध प्रकल्प (IADP)" म्हणून ओळखलं जातंय. दक्ष आणि त्याच्या मित्रांना त्यांच्या शाळेच्या खगोलशास्त्र क्लबद्वारे हा प्रकल्प सापडला होता. त्यानंतर त्यांनी हा NASA च्या "इंटरनॅशनल ॲस्ट्रॉनॉमिकल सर्च कोलाबोरेशन (IASC)" प्रोग्रामबद्दल ईमेल पाठवला.

दक्ष आणि त्याच्या मित्रांनी ‘ॲस्ट्रोनॉमिक’ या खास सॉफ्टवेअरच्या मदतीने नासाच्या डेटाची माहिती घेतली. त्यांनी आकाशात फिरणाऱ्या वस्तूंचं निरीक्षण केलं आणि त्यातून निघणाऱ्या प्रकाशाचं विश्लेषण केलं. ही प्रक्रिया करत असताना दक्ष म्हणाला, "हे प्रोजेक्ट करताना खूप मजा आली. जेव्हा मी लघुग्रह शोधत होतो, तेव्हा मला असं वाटले की, मी स्वतः नासामध्ये काम करतोय."

दक्ष ठेवणार याचं नाव

दक्ष मलिकने लघुग्रह 2023 OG40 चा शोध लावला. पण या शोधाची खातरजमा करण्यासाठी NASA ला 4 ते 5 वर्षे लागतील. यानंतर दक्षला या लघुग्रहाचं नाव देण्याची संधी मिळणार आहे. दक्ष गमतीने म्हणाला, "मला त्याचे नाव 'डेस्ट्रॉयर ऑफ द वर्ल्ड' किंवा 'काउंटडाउन' द्यायचं होतं कारण ही नावं थोडी मनोरंजक आणि धोकादायक वाटतात."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांकडून हेल्पलाइन नंबर जारी

Ganpati Visarjan : पुण्यात गणपती विसर्जनावेळी दुर्घटना, मिरवणुकीदरम्यान दोन जणांना विजेचा शॉक

Maharashtra Live News Update: प्रयागराजमध्ये गंगा आणि यमुना नदीच्या पाणी पातळीत वाढ, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

'दम मारो दम' राष्ट्रवादी काँग्रेसचा नेता नशा करण्यात दंग, 'तो' व्हिडिओ व्हायरल

Aayush Komkar: क्लासवरून घरी येत होता, बेसमेंटमध्ये दोघांकडून अंदाधुंद गोळीबार; आयुष कोमकर हत्या प्रकरणात मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT