Rent Agreement Mistakes  Saam tv
लाईफस्टाईल

Rent Agreement Mistakes : तुम्ही देखील घर भाड्याने देताय ? भाडे करार करताना या 8 चुका टाळाच !

Rent Agreement For House : तुम्ही देखील तुमच्या घरात भाडेकरु ठेवत असाल तर या गोष्टींची काळजी घ्यायला हवी.

कोमल दामुद्रे

8 Mistakes To Avoid While Making Rent Agreement : हल्ली कामासाठी अनेक तरुण वर्ग मुंबईमध्ये राहण्यास येतात. अशावेळी ते नोकरी लागताच भाड्याने घर शोधण्याचा प्रयत्न करतात. तुम्ही देखील तुमच्या घरात भाडेकरु ठेवत असाल तर या गोष्टींची काळजी घ्यायला हवी.

घर भाड्याने देणार असाल तर करार करताना काही गोष्टींची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. घर भाड्याने देताना रेंट ऍग्रीमेट करणे आवश्यक आहे. जर तुम्ही योग्य तो करार केला नाही तर पुढे अनेक अडचणींना सामोरे जावे लागू शकते. भाडे करार करताना कोणत्या 8 चुका करू नयेत हे जाणून घेऊया.

1. चुकीचे भाडेकरू टाळा-

घर (Home) किंवा कोणतीही मालमत्ता भाड्याने देण्याआधी, भाडेकरूबद्दल योग्य ती माहीती काढा. यापूर्वी ते कुठे राहात होते का याचा तपास करा. चुकीच्या भाडेकरूला घरात ठेवल्यास तुम्हाला अनेक समस्यांना (Problem) सामोरे जावे लागू शकते.

2. भाडे विचारपूर्वक ठरवा-

भाडे निश्चित करताना तुमच्या घराचा आढवा घ्या. तसेच भाडेकरुला घर देताना त्याने त्या घराची योग्य काळजी (Care) घ्यायला हवी हे देखील पाहा. त्यानुसार तुम्ही भाडेही निश्चित करा.

3. व्यावसायिक पद्धतीने भाडेकरू सेट करा-

ओळखीच्या लोकांना भाडेकरु म्हणून ठेवत असाल तर काही गोष्टींची काळजी घेणे अधिक गरजेचे आहे. भाडेकरार करताना तुम्ही मालक आणि तो देयक आहे अशा पद्धतीने काही गोष्टी सेट करा. भाडेकरार केल्यानंतरच मालमत्ता भाडेकरूच्या ताब्यात द्या.

4. भाडेकरार कालावधी-

कायदेशीररित्या सामान्य भाडेकरार 11 महिन्यांचा असतो. त्यासाठी तुम्ही योग्य तारीख व वेळ ठरवा. ज्यामुळे इतर अडचणींना योग्यप्रकारे सामोरे जाल

5. समाप्ती आणि सूचना-

जर भाडेकरू करारात दिलेल्या अटींचे पालन करत नसेल तर, घरमालक त्याला घर रिकामे करण्यास सांगू शकतो आणि करार तोडू देखील शकतो. त्याचबरोबर भाडेकरू आणि घरमालक यांना घर रिकामे करण्यासाठी नोटीस म्हणून एक महिन्याची मुदतही द्यावी लागते.

6. लॉक-इन कालावधी-

या स्थितीत घरमालक भाडेकरूला माहीती न देता शहराबाहेर जाऊ देत नाही. म्हणजेच भाडेकरूला घर रिकामे करून दुसऱ्या शहरात जायचे असेल, तर घरमालकाला त्याची आधीच माहिती द्यावी लागते.

7. पेमेंट-

घरभाडे देताना घरमालक व भाडेकरु यांनी एक वेळ निश्चित करायला हवी. त्याच तारखेला भाडेकरुने घरमालकाला भाडे द्यावे लागते. अन्यथा घरमालक त्यावर ज्यादा पैसे मोजू शकतो.

8. डिफॉल्ट क्लॉज-

या नियमांतर्गत जमीन मालक स्वतःच्या अटी आणि दंड स्वतः ठरवू शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: परळीत ५० हजार मतांनी धनंजय मुंडे आघाडीवर

Cardamom Benefits: बहुगुणी वेलचीचे 'हे' फायदे तुम्हाला माहित आहे का?

Jharkhand Election Result: झारखंडमध्ये भाजपला धक्का, इंडिया आघाडीनं बहुमत गाठलं, कुणाला किती जागांवर आघाडी?

IND vs AUS 1st Test: लाईव्ह सामन्यात हर्षित राणा अन् मिचेल स्टार्क भिडले! नेमकं काय घडलं? -VIDEO

Vidhan Sabha Election Results : सुरुवातीच्या कलात भाजपने गाठलं शतक!

SCROLL FOR NEXT