Sakshi Sunil Jadhav
आचार्य चाणक्य हे राजनिती तज्ज्ञ म्हणून ओळखले जातात. याचसोबत त्यांनी आयुष्यात यशस्वी होण्यासाठी काही गुपितं सुद्धा सांगितली आहेत.
चाणक्यांचे मते, आयुष्यातल्या अशा काही गोष्टी असतात, ज्या कधीही कोणालाच सांगितल्या नाही पाहिजेत.
समोरची व्यक्ती तुमची कितीही खास असेल, जवळची असेल तरीही तुम्ही गुपितं लपवलीच पाहिजेत.
तुमची ही गुपितं इतरांना किंवा मित्रांना सांगितल्याने तुमच्यात भांडण होऊ शकते. पुढे तोच मित्र तुमचा दुश्मन होऊ शकतो.
तुम्हाला किती पगार आहे आणि तो कुठून येतो? याविषयी मित्रांमध्ये अजिबात चर्चा करु नका. त्याने मित्रांच्या मनात नकळत द्वेश, लालच निर्माण होईल.
तुमची कमजोरी किंवा अपमानास्पद प्रसंग कोणालाच सांगू नका. तुमची कमजोरी ही इतरांसाठी शस्त्र असू शकते.
चाणक्यांच्या मते, तुमच्या भविष्यातल्या सगळ्यांच महत्वाच्या गोष्टी किंवा धैर्य कोणालाच सांगायच्या नाहीत. त्याने लोक तुमच्या नकळत त्यागोष्टी करुन पुढे निघून जाऊ शकतात.