Car Driving Tips: पहिल्यांदाच कार चालवायला शिकताय ? या 5 गोष्टींची घ्या काळजी, अन्यथा होईल मोठे नुकसान

Safe Car Driving Tips : तुम्ही गाडीचं स्टेअरिंग पहिल्यांदा हातात आलं की घाबरत असाल तर या ५ गोष्टी नेहमी लक्षात ठेवा
Driving Tips
Driving TipsSaam Tv
Published On

Car Driving Tips For Beginners : आपल्यापैकी अनेकांना चारचाकी शिकायची असते. त्यासाठी अनेकजण ड्रायव्हिंग स्कूलमध्ये अॅडमिशन देखील घेतात. पाहायला गेले तर कार चालवणे हे कठीण नाही परंतु, काही गोष्टींची काळजी घेतली तरी होणाऱ्या नुकसानापासून आपण वाचू शकतो.

तुम्ही कारचं स्टेअरिंग पहिल्यांदा हातात आलं की घाबरत असाल तर या ५ गोष्टी नेहमी लक्षात ठेवा त्यामुळे चारचाकी चालवणे अधिक सोपे होईल. जाणून घेऊया त्याबद्दल सविस्तर

Driving Tips
Monsoon Car Tips : पावसाळ्यात अचानक तुमची बाईक-कार अडकली तर, कशी वाचवाल ? जाणून घ्या या खास टिप्स

ड्रायव्हिंग शिकण्यापूर्वी तुम्हाला वाहतूक नियमांची माहिती असणे आवश्यक आहे . जर तुम्ही वाहतुकीच्या नियमानुसार (Rules) वाहन चालवलो तर रस्त्यावर होणाऱ्या अपघातांपासून तुम्ही स्वतःला आणि इतरांना वाचवू शकता.

1. सिम्युलेटर वापरा:

ड्रायव्हिंग स्कूलमध्ये रस्त्यावर ड्रायव्हिंग शिकवण्यापूर्वी, सिम्युलेटरद्वारे विद्यार्थ्यांना ड्रायव्हिंगचे प्रशिक्षण दिले जाते. याचा फायदा असा होतो की, जी व्यक्ती वाहन (Car) चालवायला शिकत आहे, त्याला रस्त्यावरील वाहनाचा तोल, इतर वाहनांपासूनचे अंतर, प्रत्येक वळणावर येणारी वेगमर्यादा, ओव्हरटेकिंगच्या वेळी येणारा आत्मविश्वास, ब्रेक लावणे इत्यादी गोष्टीची कळतात. तसेच त्यानंतर जेव्हा विद्यार्थी रस्त्यावर गाडी चालवतो तेव्हा त्याला ड्रायव्हिंगची मूलभूत माहिती कळते.

Driving Tips
Bike Engine Oil Tips: बाईकचे इंजिन ऑइल कधी बदलायचे? या 4 गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा बसेल पैशांचा फटका !

2. वेगात गाडी चालवू नका:

बरेचदा असे दिसून आले आहे की तरुण खूप वेगाने गाडी चालवतात, पण ते हे विसरतात की जितका वेग जास्त तितका अपघात होण्याची शक्यता असते. त्यामुळे रस्त्यावर वाहन नेहमी संथ गतीने चालवावे. जेणेकरून तुम्ही स्वतःला सुरक्षित (Safety) ठेवू शकाल आणि बाजूने चालणारी वाहनेही सुरक्षित ठेवू शकाल.

3. सीट बेल्ट लावायला विसरू नका:

कारमध्ये बसताच सर्वात आधी सीट बेल्ट लावा, याशिवाय तुमच्यासोबत बसलेल्या व्यक्तीला सीट बेल्ट लावायला सांगा. मागे बसलेल्यांना सीट बेल्ट घालणे बंधनकारक आहे. चालान टाळण्यासाठी नाही तर तुमच्या सुरक्षिततेसाठी सीट बेल्ट लावावा लागेल. बहुतांश रस्ते अपघातांमध्ये चालकाने सीट बेल्ट घातला नसल्याचे अनेकदा दिसून आले आहे.

Driving Tips
Gauri Nalawde : भाव अंतरीचे हळवे जसे जुई फुल, गौरीच्या सौंदर्याचं निरागस रुप...

4. रस्त्यावर लक्ष केंद्रित करा:

वाहन चालवताना तुमचे लक्ष फक्त रस्त्यावर असले पाहिजे. गाडी चालवताना फोनवर बोलणे किंवा मेसेज करणे टाळावे, गाडीत बसलेल्या लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नये, कारण अनेकदा बोलत असताना गाडीचा तोल सांभाळला जात नाही आणि अपघात होतो.

Driving Tips
Prarthana Behere : कपाळी चंद्रकोर, केसात गजरा, प्रार्थानाच्या साडीवर साऱ्यांच्या नजरा...

5. आरशांचा वापर करा:

कार चालवताना, रियर व्ह्यू मिरर आणि विंग मिरर म्हणजेच साइड मिररचा योग्य प्रकारे वापर करा. यासाठी तुम्हाला सर्व आरसे व्यवस्थित दिसले पाहिजेत, ज्यामुळे तुम्ही उजवीकडून, डावीकडून येणाऱ्या वाहनावर लक्ष ठेवू शकता. कार मागे राहिल्यास किंवा कार उलटताना मागे पाहण्यासाठी आपले डोके कारमधून बाहेर काढणे टाळा.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com