Causes of Uric Acid Saam Tv
लाईफस्टाईल

Causes of Uric Acid : पोटात जाताच 'ही' फळे शरीरात वाढवतात यूरिक अॅसिडची समस्या, किडनी स्टोनचा देखील वाढतो धोका !

Kidney Stone Problem : किडनी स्टोन, सांधेदुखी याचे मुख्य कारण म्हणजे युरिक अॅसिडचे प्रमाण वाढलेले आहे.

कोमल दामुद्रे

How To Lower Uric Acid Level In Blood : रक्तातली युरिक अॅसिडचे प्रमाण वाढल्याने आरोग्याविषयी अनेक समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. किडनी स्टोन, सांधेदुखी याचे मुख्य कारण म्हणजे युरिक अॅसिडचे प्रमाण वाढलेले आहे.

युरिक अॅसिड म्हणजे रक्तामध्ये आढळणारा एक घाणेरडा पदार्थ आहे.अनेक पदार्थांमध्ये प्युरीन असते आणि जेव्हा शरीर प्युरीनचे विघटन करते तेव्हा युरीक अॅसिड रक्तातमध्ये प्रवेश करते.हे युरीक अॅसिड रक्ततात विरघळते किंवा लघवीतून शरीराबाहेर जाते.पण शरीरात त्याचे प्रमाण खूप जास्त वाढल्याने ते शरिरातच क्रिस्टलाच्या स्वरूपात साठून राहते.

तुम्हाला हे जाणून आश्र्चर्य होईल, पण प्यूरीनच नाही तर फ्रक्टोज देखील युरिक ऍसिड वाढवण्याचे काम करते. रोज खाणाऱ्या अशा काही गोष्टींमध्ये फ्रक्टोज चे प्रमाण आढळते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला इथे अशा काही गोष्टींन बद्दल सांगणार आहे ज्याचे अधिक प्रमाणात सेवन केल्याने शरीरातील युरिक अॅसिडचे पातळी वाढू शकते.

1.मनुका (Raisin)

मनुका म्हणजेच वाळलेले द्राक्ष यात फायबरचे प्रमाण खूप जास्त असते. एका औंस मनुक्यात 9.9 ग्रॅम फ्रक्टोजचे प्रमाण देखील असते त्यामुळे तुम्हाला जर गाउटचा त्रास होत असेल तर याचे सेवन करू नका.

2. फणस (Jackfruits)

फणस आपण फळ (Fruit) म्हणून आणि भाजी बनवून सुद्धा खाल्ले जाते. फणस खायला खूप चवदार लागते फणसाला मासांपेक्षा निरोगी समजतात पण myfoodata यांच्या अहवालानुसार एक कप चिरलेला फणसामध्ये 15.2 ग्रॅम फ्रक्टोजचे असतात.

3. द्राक्ष (Graps)

द्राक्ष या फळांमध्ये व्हिटॅमिन सी आणि फायबरचे सार्वधिक मुबलक प्रमाण असते,पण या फळात फ्रक्टोजचे प्रमाण देखील असते. हिरव्या आणि लाल द्राक्ष यात प्रति कप 12.3 ग्रॅम फ्रक्टोज असते

Causes of Uric Acid

4. सफरचंद (Apple)

सफरचंद हे आरोग्यासाठी (Health) चांगले समजले जाते यात फायबर पॉलीफेनाल आणि पोटॅशियम यासारखे पोषक घटक असतात यात शंकाच नाही पण जर तुम्ही दिवसातून एक सफरचंद खाल्ला तर 12.5 ग्रॅम फ्रक्टोज मिळते.

5. ब्ल्यूबेरी (Blueberry)

एक कप ब्ल्यूबेरी मध्ये 7.4फ्रक्टोज असते.जे यूरिक अॅसिड असलेल्यांसाठी धोकादायक आहे. ब्लूबेरी फायबर आणि व्हिटॅमिनसाठी (Vitamins) महत्वाचे स्त्रोत समजले.पण याचे अति सेवन केल्याने आरोग्याचे नुकसान होऊ शकते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Election Commission: जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी 13 ऑक्टोबरला आरक्षण सोडत

Hair Care: हेल्दी आणि शायनी केस हवेत? मग 'हा' पदार्थ नक्की ट्राय करा, आठवड्याभरात दिसेल फरक

Fodnicha Bhat Recipe : ऑफिसवरून आल्यावर झटपट बनवा 'असा' चटपटीत फोडणीचा भात, आवडीने खातील सगळे

Gold Price: मागच्या वर्षीचा सोन्याचा दर काय होता?

Bihar Election : निवडणकीआधीच मुख्यमंत्र्यांना मोठा धक्का; फायरब्रँड नेता पक्षाला रामराम ठोकणार

SCROLL FOR NEXT