How To Reduce Uric Acid : युरिक ऍसिडने त्रस्त आहात ? दररोज खा 'हे' फळ, मिळेल आराम

यूरिक ऍसिड हा एक आपल्या लिव्हरमध्ये बनणारा पदार्थ आहे.
How To Reduce Uric Acid
How To Reduce Uric AcidSaam Tv
Published On

Uric Acid : सध्याच्या काळात युरिक ऍसिड हा आजार वाढतच चालला आहे. बरेच लोकं युरीक ऍसिडच्या आजारामुळे त्रस्त आहेत. यूरिक ऍसिड हा एक आपल्या लिव्हरमध्ये बनणारा पदार्थ आहे.

तो पदार्थ किडणीमधुन निघून युरीनच्या माध्यमाद्वारे बाहेर पडते. जेव्हा आपल्या शरीरामधील यूरीक ऍसिडचे प्रमाण सामान्य प्रमाणापेक्षा जास्त होते. तेव्हा आपल्या शरिरातील छोटया जॉइंटमध्ये जमा होते. यामुळे गाउटची (Gout) समास्या निर्माण होऊ शकते. युरीक ऍसिडला कंट्रोल करण्यासाठी चांगले खाणेपिणे आणि चांगली लाईफस्टाईल अत्यंत आवश्यक आहे.

युरीक ऍसिडच्या रुग्णांना जास्त प्रमाणात फळांचं सेवन करायला पाहिजे. काही फळांच्या सेवनाने आपल्या शरीरातील युरीक ऍसिड बाहेर पडते आणि गाऊटची समस्या कमी होते.

How To Reduce Uric Acid
Urine Infection Problem : महिलांना युरिन इन्फेक्शन सहज का होते? जाणून घ्या, कारणे

त्याचबरोबर असं मानल जातं की केळी हे फळं खाल्ल्याने युरीक ऍसिडने ग्रस्त असलेला रोगी लवकर बरा होऊ शकतो. तुम्हाला सुद्धा युरीक ऍसिड या रोगाचा त्रास असेल तर तुम्ही रोज एक केळी खाऊन तुमचं युरीक ऍसिडला कंट्रोलमध्ये ठेवू शकता. एवढंच नाही तर, गाउट या समस्येला देखील केळी (Banana) ठीक करू शकते. आज आपण हे जाणून घेऊया की कोणत्या प्रकारे केळीने हाई युरीक ऍसिडवर आपण मात करु शकतो.

हेल्थलाईनच्या रिपोर्टनुसार हाई यूरीक ऍसिड असणाऱ्या रोग्यांनी लो प्युरीनवाले पदार्थ खाल्ले पाहिजे. लो प्युरीन असणारे पदार्थ खाल्ल्याने शरीरामधील युरीक एसिडचे प्रोडक्शन कमी करते. केळी हे फळं लो प्युरीनच्या पदार्थांमध्ये सर्वात वरच्या क्रमांकावर आहे. यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणत असते ज्यामुळे गाउटपासून बचाव होतो.

Banana
Banana canva

एका केळीमध्ये एकूण 14 मिलिगग्राम व्हिटॅमिन (Vitamins) सीचे पोषक तत्वे असतात. जे तुमच्या आरोग्याला (Health) फायदेशीर (Benefits) असतात. जर तुमची यूरीक ऍसिड लेवल जास्त आहे तर तुम्ही नियमीत केळी खाल्ली पाहिजे.

त्याचबरोबर सफरचंद (Apple), किवी, संत्री, चेरी आणि केळी या फळांचं सेवन केल्याने तुमची यूरीक लेवल नियंत्रित राहण्यास मदत होते आणि गाउटची समस्या देखील कमी होते. युरीक ऍसिड झलेल्या रोग्यांनी नॉनवेज पासून लांबच राहायला हवे आणि रेड मीट तर खाऊच नये. याशिवाय तुम्ही हाई प्युरीन पदार्थांचे सेवन करण्यास सुरुवात करा. त्याचबरोबर सकाळी लवकर उठून निदान 30 मिनिटे तरी व्यायाम देखील केला पाहिजे.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com