Smartphone Launch : स्मार्टफोनचे अनेक पर्याय बाजारात आधीच उपलब्ध आहेत. जर तुम्हाला नवीन स्मार्टफोन घ्यायचा असेल, तर तुम्हाला थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे. या महिन्यात मे मध्ये अनेक दमदार स्मार्टफोन लॉन्च होत आहेत.
या स्मार्टफोनसोबत (Smartphone) फोल्डेबल स्मार्टफोनचाही समावेश असणार आहे. तसेच, प्रीमियम ते मिड-बजेट आणि बजेट स्मार्टफोन लॉन्च केले जातील, तर जाणून घेऊया या महिन्यात कोणते दमदार स्मार्टफोन लॉन्च केले जात आहेत.
1. Google Pixel 7a
Google Pixel 7a हा स्मार्टफोन साधारणत: रु 45,990 रुपयांपर्यंत मिळेल. या स्मार्टफोनला 6.1-इंचाचा AMOLED डिस्प्ले मिळेल, जो 90Hz रिफ्रेश रेटसह येईल. यात 4500 mAh ची मोठी बॅटरीही मिळणार आहे. फोनमध्ये Sony IMX787 लेन्ससह 64MP OIS कॅमेरा (camera) असेल. फोनमध्ये कंपनीचा स्वतःचा Tensor G2 चिपसेट दिला जाईल.
2. Pixel Fold:
Pixel Fold हा फोन १० मे ला लॉन्च होण्याची शक्यता आहे. याची किंमत 145,690 साधारणत: असेल. या स्मार्टफोनला 5.8 इंच कव्हर डिस्प्ले मिळेल. तसेच 7.69 इंचाचा इनर डिस्प्ले असेल. हे 12 GB रॅम आणि 256 GB अंतर्गत स्टोरेजसह येईल. सेल्फीसाठी, हे मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा सेटअपसह काही अतिरिक्त पंच-होल कॅमेऱ्यांसह येईल.
3. Samsung Galaxy F54
Samsung Galaxy F54 हा फोन साधरणत: 24,990 रुपयांपर्यंत मिळेल. Samsung Galaxy F54 स्मार्टफोन 8GB रॅम आणि 128GB अंतर्गत स्टोरेजसह येईल. यात 120Hz रिफ्रेश रेट आणि Exynos s5e8835 प्रोसेसर सपोर्ट मिळेल. फोनमध्ये 108 एमपी प्राइमरी कॅमेरा मिळेल तसेच 6.7 इंच फुल एचडी + सुपर एमोलेड डिस्प्ले दिला जाऊ शकतो.
4. Realme 11 Pro
Realme 11 Pro हा स्मार्टफोन 28,990 रुपयांपर्यंत मिळेल. या स्मार्टफोनमध्ये 5,000mAh बॅटरी मिळेल, जी 67W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येईल. फोनमध्ये 108MP रियर कॅमेरा सेटअप मिळेल. फोन MediaTek Dimensity 7000 चिपसेट सपोर्टसह येईल. फोन 6GB रॅम आणि 128GB अंतर्गत स्टोरेज सपोर्टसह येईल.
5. Realme 11 Pro+
Realme 11 Pro+ हा साधरणत: 10 किंवा 11 मे ला लॉन्च होण्याची शक्यता आहे. यामध्ये तीन स्टोरेज पर्याय असतील. ज्यामध्ये 8 जीबी रॅम 128 जीबी स्टोरेज, 8 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज आणि 12 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेजचा पर्याय मिळू शकतो. या फोनची किंमत (Price) साधरणत: 34990 रुपयांपर्यंत मिळेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.