Smartphone side effects : मोबाइल उशाशी ठेवून झोपण्याच्या सवयीमुळं कॅन्सरचा धोका? तज्ज्ञांकडून गंभीर इशारा

Is it safe to sleep with a phone near the pillow : जगभरातील 90 टक्के लोक उशीजवळ फोन घेऊन झोपतात ज्यामुळे आपल्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होतो.
Smartphone side effects
Smartphone side effects Saam Tv

Cancer Risk : कॅन्सरचे नाव ऐकले की, अनेकांना टेन्शन येते. कर्करोग हा आजही जगातील सर्वात मोठी जीवघेणी समस्या आहे. हजारो लोक या आजारामुळे दरवर्षी मृत्यू पावतात. अनेकांचा असा समज आहे की, कर्करोग हा धुम्रपान व तंबाखू खाण्यामुळे होतो. परंतु, हे एकच कारणं त्याला पुरेसे नाही.

कर्करोग (Cancer) हा जीवघेणा आजार असला तरी या आपल्या दैनंदिन चुकांमुळे आपल्याला तो होण्याची अधिक शक्यता असते. जगभरातील 90 टक्के लोक उशीजवळ फोन घेऊन झोपतात ज्यामुळे आपल्या आरोग्यावर (Health) त्याचा विपरीत परिणाम होतो. असे मत कॅन्सर तज्ज्ञ डॉ. राज नगरकर यांनी मांडले आहे.

Smartphone side effects
Symptoms Of Kidney Cancer : किडनी कॅन्सरच्या या लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष

ते म्हणतात की, मोबाईल (Smartphone) फोनमध्ये असणारे रेडिएशनमुळे आपल्या शरीरातील इतर भागांना धोका होण्याची शक्यता आहे. यात असणारे अल्फा आणि बीटा किरणांपेक्षा जास्त आहे, हे किरण वायूचे आयनीकरण करतात.

डॉक्टरांनी सांगितले की, मागच्या काही वर्षात मोबाईल अविभाज्य भाग बनला आहे. ज्यामुळे मोबाईल फोनमुळे गॅमा रेडिएशन एमिट होत असते. अनेकांना रात्री झोपताना उशाशी बऱ्याचदा चार्जिंग पॉइंटला लावून ठेवलेला असतो. ज्यामुळे इलेक्ट्रोमॅग्नेटिक फिल्ड तयार होते, त्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक फिल्डमध्ये झोपेत असतो ज्यामुळे गॅमा रेडिएशनमुळे कॅन्सर होण्याची शक्यता अधिक आहे व भविष्यात संशोधनानंतर आपल्याला याची सखोल माहीती मिळू शकते.

Smartphone side effects
Side Effects of smartphone using in Toilet : तुम्हालाही टॉयलेटमध्ये फोन वापरण्याची सवय आहे ? आधी जाणून घ्या त्याचे दुष्परिणाम

1. मोबाईल फोनमुळे आरोग्यावर होणारा परिणाम

  • मोबाईल फोन्समुळे सतत चिडचिड वाढलीये. तसेच एकाग्रता कमी झाली आहे.

  • मोबाईल एडिक्शनमुळे त्याचा थेट कॅन्सरशी संबंध जोडाला जात आहे परंतु, अजूनही याबाबत स्पष्टपणे काही सांगता येत नाही.

  • मात्र मोबाईलचा कमीत कमी वापर तसेच झोपतांना मोबाईल फोन किमान ३ ते ४ फूट लांब ठेवावा

  • बदलत्या जीवनशैलीमुळे येत्या काळात देशात सर्वाधिक रुग्ण कॅन्सरमुळे ग्रस्त होतील असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com