
Is it safe to take mobile phone to toilet : अनेकांना सकाळी झोपेतून उठल्यानंतर फोन चाळायची सवय असते. सकाळी उठल्यानंतर ते रात्री झोपेपर्यंत १०० टक्के पैकी ९० टक्के लोक त्याचा वापर करतात. स्मार्टफोन हा आपल्या दैनंदिन जीवनातील महत्त्वाचा भागच झाला आहे. दिवसभर हातात असूनही अनेकांना तो आंघोळीच्या वेळी किंवा वॉशरुमला जातानाही लागतो.
आपल्यापैकी अनेक लोक त्याला बाथरुममध्ये घेऊन जाऊन तासंनतास त्यावर स्क्रोल करत बसतात. परंतु, तुम्हाला माहित आहे का ? बाथरुममधली जागा ही आरोग्यासाठी (Health) अधिक घातक समजली जाते. जाणून घेऊया त्याचे दुष्परिणाम
1. टॉयलेटमध्ये फोन वापरणे तुमच्या आरोग्यासाठी खूप हानिकारक ठरु शकते. टॉयलेट ही अशी जागा आहे जिथे भरपूर बॅक्टेरिया आणि जंतू वाढतात. मग ते टॉयलेट सीट, टॅप, फ्लश बटण किंवा इतर गोष्टी असो. जर तुम्ही तुमचा फोन घेतला आणि या सर्व गोष्टींना स्पर्श केल्यानंतर तुमचा फोन वापरला तर बॅक्टेरिया फोनमध्ये येतात आणि सरळ ते तुमच्या शरीरात प्रवेश करतात.
2. जर तुम्ही टॉयलेटच्या कमोडवर तुमचा फोन घेऊन बराच वेळ बसलात तर त्यामुळे तुमच्या स्नायूंमध्ये जडपणा येऊ शकतो आणि गुडघेदुखी (Knee pain) देखील सुरू होऊ शकते.
3. सकाळी फ्रेश होण्यासाठी तुम्हाला फक्त 2 ते 3 मिनिटे लागतील. तुमचे पोट जितके लवकर स्वच्छ (Clean) होईल तितके तुम्ही निरोगी असाल असे आयुर्वेद नेहमी सांगते. पण असे दिसून आले आहे की लोक अर्धा तास फोन घेऊन कमोडवर बसून राहतात, त्यामुळे त्यांना नीट फ्रेश होता येत नाही.
4. टॉयलेटमध्ये जास्त वेळ बसून राहिल्याने गुदाशयावर जास्त ताण येतो, ज्यामुळे मुळव्याध सारख्या समस्या निर्माण होतात.
5. एका रिसर्चनुसार, टॉयलेटमध्ये फोन वापरल्याने तुमच्या मानसिक आरोग्यावरही परिणाम होतो, कारण काही लोक टॉयलेटमध्ये बसून खोलवर विचार करतात किंवा मोठे प्लान बनवतात. परंतु जेव्हा तुम्ही फोन घेता तेव्हा त्यांचा संपूर्ण वेळ वाया जातो. ज्याचा तुमच्या मानसिक आरोग्यावरही परिणाम होतो.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.