Improve Blood Flow Naturally google
लाईफस्टाईल

Heart Health: शरीरामधील रक्तप्रवाह चांगला होण्यासाठी आत्ताच करा या ५ ज्यूसचे सेवन, राहाल सुरक्षित

Improve Blood Flow Naturally: थंडीच्या दिवसांत रक्तप्रवाह सुधारण्यासाठी आणि हृदय निरोगी ठेवण्यासाठी बीटरूट ज्यूस, हिबिस्कस टी आणि कोकोसारखी नैसर्गिक पेये उपयुक्त ठरू शकतात.

Sakshi Sunil Jadhav

सध्या थंडीचे दिवस सुरु आहेत. सर्दी-खोकला या दिवसात असतोच. पण या दिवसात हार्टच्या रुग्णांची विशेष काळजी घेणं गरजेचं असतं. कारण थंडीत रक्त गोढण्याच्या समस्या मोठ्या प्रमाणात जाणवत असतात. त्यामध्ये अर्थात तुमच्या जीवनशैलीचा अभाव यावर होत असतो. चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळे तुम्हाला भविष्यात जीवघेण्या आजारांना सामोरं जावं लागू शकतं. पुढे आपण यावर काही उपचार जाणून घेणार आहोत.

ह्रदय निरोगी ठेवण्यासाठी आणि नसांमधला रक्तप्रवाह सुधारण्यासाठी काही पेयांचा उपयोग होऊ शकतो, असं संशोधनातून कळालं आहे. निरोगी नसांसाठी रक्तवाहिन्यांच्या भिंती फ्लेक्सिबल असणं आणि शरीरात नायट्रिक ऑक्साइडची योग्य पातळी असणं महत्त्वाचं मानलं जातं. यासाठी घरच्या घरी तयार होणारी काही पेयं फायदेशीर ठरू शकतात.

बीटरूट ज्यूस

बीटरूट म्हणजेच बीटाचा रस हा रक्तप्रवाह सुधारण्यासाठी फायदेशीर मानला जातो. बीटामध्ये नैसर्गिक नायट्रेट मोठ्या प्रमाणात असतं. शरीरात गेल्यानंतर याचं रूपांतर नायट्रिक ऑक्साइडमध्ये होतं, त्यामुळे रक्तवाहिन्या सैल होतात.

हिबिस्कस टी

हिबिस्कस म्हणजेच जास्वंदीच्या फुलांचा काढा किंवा चहा सुद्धा हृदयासाठी फायदेशीर मानला जातो. या फुलांमध्ये अँथोसायनिन्स नावाचे घटक असतात, जे रक्तदाब कमी करण्यात मदत करतात. साखर न घालता घेतलेला हिबिस्कस चहा रोज सेवन केल्याने नसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतो.

कोको पावडर

कोकोपासून बनवलेले, पण साखर न घातलेलं ड्रिंक हे हार्टसाठी चांगलं मानलं जातं. कोकोमध्ये फ्लॅव्होनॉल्स असतात, जे नायट्रिक ऑक्साइडच्या कार्याला चालना देतात. त्यामुळे रक्तवाहिन्यांचा विस्तार होऊन रक्तदाब आणि एंडोथेलियल फंक्शनमध्ये सुधारणा होऊ शकते. पण तयार चॉकलेट ड्रिंक्सपेक्षा नैसर्गिक, शुगर फ्री कोको वापरणं जास्त फायदेशीर ठरतं.

डिस्क्लेमर: ही माहिती केवळ सामान्य जनजागृतीसाठी आहे. वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय म्हणून याकडे पाहू नये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL 2026: प्रियांश-कॉनॉलीच्या वादळी खेळीपुढे लखनौचा संघ ढेर, पंजाब किंग्सच्या विजयाचा पंजा

Raqesh Bapat: आधी लग्न मोडलं मग ब्रेकअप; बिग बॉस फेम राकेश बापटच्या लव्हलाईफमध्ये मोठा गोंधळ

Bigg Boss Marathi 6 Winner : अर्ध्यावर सोडली मालिका अन् थेट बिग बॉसमध्ये एन्ट्री, 'टास्क क्वीन'चा प्रवास कसा होता?

Bigg Boss Marathi 6: नशिबाचा गेम पालटला; राकेश बापट ठरला उपविजेता; तर, तन्वी कोलतेने जिंकली बिग बॉस मराठी ६ची ट्रॉफी

Bigg Boss Marathi 6 Winner : तन्वी कोलतेनं उचलली 'बिग बॉस मराठी ६' ची ट्रॉफी; राकेश बापटला दिली मात, बक्षिसात काय काय मिळाले? VIDEO

SCROLL FOR NEXT