Sakshi Sunil Jadhav
बाजारात चर्चेत असलेली टाटा Punch कार ग्राहकांच्या आवडत्या याद्यांमध्ये येत आहे. पुढे आपण या कारबद्दल जाणून घेणार आहोत.
टाटा मोटर्सने त्यांची पॉप्युलर मायक्रो SUV पंच नव्या स्टाइलमध्ये बाजारात आणली आहे. यात कारचा फेसलिस्ट मॉडल लूक संपूर्णपणे बदलला आहे.
नवीन टाटा पंचची किंमत ५.५९ लाख रुपयांपासून सुरू होत आहे आणि ती एकूण ६ प्रकारांमध्ये असणार आहे.
यामध्ये तुम्हाला स्मार्ट, प्युअर, प्युअर प्लस, अॅडव्हेंचर, अॅकॉम्पलिस्ड आणि अॅकॉम्पलिस्ड प्लस एस प्रकारांचा समावेश आहे.
स्मार्ट व्हेरियंटमध्ये एलईडी हेडलॅम्प, १५-इंच स्टील व्हील्स आणि स्टँडर्ड बल्ब वापरणारे मागील टेल लॅम्प आहेत. दरवाजाचे हँडल काळ्या रंगाचे असतील, त्यामुळे कारला एक साधा आणि क्लिअर लूक मिळेल.
केबिनमध्ये २-स्पोक स्टेअरिंग व्हील आहे. डॅशबोर्ड काळ्या आणि राखाडी रंगाच्या कॉम्बिनेशनमध्ये तयार केला आहे. सीट्समध्ये काळ्या फॅब्रिक अपहोल्स्ट्री आहे.
तुम्हाला या कारमध्ये मॅन्युअल AC मिळेल. आरामदायी गोष्टींमध्ये कीलेस एंट्री, सेंट्रल लॉकिंग, ड्राइव्ह मोड्स, फॉलो-मी-होम हेडलॅम्प आणि फ्रंट पॉवर विंडो मिळेल.
टाटा पंच स्मार्टमध्ये एक सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आहे जो आवश्यक ड्रायव्हिंग माहिती स्पष्ट आणि सोप्या पद्धतीने करण्याचा मार्ग दाखवतो.
या कारमध्ये ६ एअरबॅग्ज, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल आणि हिल होल्ड असिस्ट सारखी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत.
मुलांच्या सुरक्षेसाठी ISOFIX चाइल्ड सीट माउंट्स दिले आहेत. सर्व सीट्समध्ये ३-पॉइंट सीट बेल्ट आणि सीट बेल्ट रिमाइंडर्स आहेत. पुढच्या सीट्समध्ये अॅडजस्टेबल हेडरेस्ट सुद्धा आहेत.
टाटा पंच फेसलिफ्टमधील सर्वात मोठा बदल म्हणजे यामध्ये आता नवीन १.२-लिटर टर्बो-पेट्रोल इंजिनची सुविधा आहे. त्यामध्ये १२० पीएस पॉवर आणि १७० एनएम टॉर्क निर्माण होऊ शकतो.