Mental Health: सकाळी उठल्यावर 'या' 5 गोष्टी चुकूनही करू नका, दिवसभर आळस अन् ताण येईल

Stress Free Life: सकाळी केल्या जाणाऱ्या काही चुकीच्या सवयी तुमच्या मानसिक शांततेवर परिणाम करतात. चिडचिड, तणाव टाळण्यासाठी सकाळची दिनचर्या योग्य असणं अत्यंत महत्त्वाचं आहे.
How Morning Routine Affects Your Mood
Morning Habits and Mental Health google
Published On

सध्या धकाधकीच्या जीवनात स्वत: कडे लक्ष द्यायला वेळच मिळत नाही. रोज सकाळी धावपळ करत उठायचं आणि कामाला जायचं. त्यात ट्रेन, रिक्षा यांसारख्या वाहतुकीतून प्रवास करायचा. पुन्हा रात्री घेऊन घरातली कामं करायची आणि झोपायचं. यातून स्वत: कडे आणि स्वत: च्या आरोग्याकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही. याचा परिणाम तुमच्या शरीरावर कशा प्रकारे होतो आणि यामुळे दिवसभर तुमची चिडचिड का वाढते? याचं उत्तर आपण जाणून घेणार आहोत.

महिला असो वा पुरुष खूप प्रवास केल्यानंतर त्यांना थकवा जाणवतो. मग आल्यावर कोणी काही बोललं की आणखी राग येतो आणि चिडचिड भांडणं होतात. कारण तुमचा प्रवास किंवा तुमच्या दिवसाची सुरुवात व्यवस्थित झालेली नसते. तुम्हाला तुमच्या चुकीच्या गोष्टींमध्ये काही बदल करता यायला हवेत. त्याने तुमची चिडचिड कमी होईल आणि तुमचा संपूर्ण दिवस आनंदात जाईल.

सकाळी उठल्यावर तुम्ही लगेचच स्क्रीन म्हणजेच मोबाईल पाहत असाल तर तो टाळा. याने तुमच्या मेंदूवर अचानक दबाव येतो आणि तुम्ही उठल्या उठल्या नकारात्मक (Negative) विचार करायला लागता. जितकं जमेल तितका उठल्यावर फोन पाहणं टाळा. याऐवजी उठल्यावर तुम्ही पाणी सेवन करु शकता.

How Morning Routine Affects Your Mood
Mumbai Street Food Recipes: मुंबईत फिरायला आलात? 'हे' 5 पदार्थ एकदा खाऊन पाहाच

उठल्या उठल्या अनेकांना सवय असते की, कामाचा विचार करणं, कर्जाचं टेन्शन घेणं, कुटुंबाचं टेन्शन घेणं या गोष्टी टाळा. वास्तू नुसार याने तुम्ही नकारात्मक विचार करायला सुरुवात करता. त्यामुळे उठल्या उठल्या छान विचार करा आणि देवाचं नामस्मरण करायला विसरु नका.

सकाळी उठल्यावर तोंड न धुता लगेचच खायला सुरुवात करु नका. हे अत्यंत अशुभ मानलं जातं. त्यामुळे तुम्हाला दिवसभर अस्वस्थ वाटतं. म्हणजेच ''वाग्याचं तेल वड्यावर निघतं'' हे ही तुम्ही म्हणू शकता. म्हणून तोंड धुतल्याशिवाय किंवा कोणताही आहार घेऊ नये.

उठल्या उठल्या एखाद्या ठिकाणी पोहोचायला किंवा कामाला उशीर होत असेल तर तुम्ही चिडचिड करता. तर ही सवय आत्ताच सोडून द्या. याने वास्तू आणि मानसिक शांतता बिघडते. कारण तुम्ही उठल्यावर जो विचार करता तोच विचार तुम्हाला दिवसभर सतावतो. अशावेळेस उठल्यावर तुम्ही शांत डोक्याने विचार करणं फायदेशीर ठरु शकतं.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

How Morning Routine Affects Your Mood
Tata Punch Price: फक्त 5.59 लाखात आलिशान कार, भन्नाट फीचर्स पाहून वेडे व्हाल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com